नबाद, 11 ऑक्टोबर : झारखंडच्या सुदामाडीह भागात काल शनिवारी रात्री एका नेत्याच्या घरात घुसून त्याच्यासह पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री जेएमएम नेता (JMM Leader) शंकर रवानी आणि त्यांच्यांवर पत्नीवर आधी गोळी चालवण्यात आली. त्यानंतर अंगणात आणून त्याच्या गळा कापण्यात आला. रविवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांनी दार उघडल नसल्याने शेजारच्यांनी अंगणात डोकावून पाहिलं तर दोघांचे मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडले होते. शेजारच्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवलं.
पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप हत्या करण्यामागील कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणात दोन कुटुंबांमधील वाद असल्याचे सांगितले जात आहे. मृत शंकर रवानी हे जेएमएस धनबाद महानगरचे उपाध्यक्ष होते. धनबाद एसएसपी असीम विक्रांत मिंच यांनी सांगितले की, जेएमएम नेता शंकर रवानी आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. दोघांच्या मृतदेहावर गोळी आणि चाकूचे निशाण दिसत आहे. ही घटना रात्री घडल्याची त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
हे ही वाचा-मेट्रो सिटीमधला धक्कादायक प्रकार; आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या
शंकर रवानी आणि त्यांची पत्नी बालिका देवी यांचा एक पूत्र आहे, जो दुसरीकडे असतो. आणखी एका मुलाची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 4 ते 5 जण त्यांच्या घरात घुसले आणि दाम्प्त्याला गोळी घातली, यानंतर त्यांना खेचत अंगणात आणलं आणि धारदार शस्त्राने गळा कापला.
3 वर्षांपूर्वी मुलाची हत्या
2017 मध्ये वादातून शंकर रवानी यांचा 25 वर्षीय मुलगा कुणाल रवानी याची हत्या करण्यात आली होती. रेनबो ग्रुप चेअरमॅन धीरेन रवानी याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर जमावाने काकाच्या हत्येच्या आरोपात कुणालची हत्या केली होती. धीरेन रवानी व कुणाल रवानी यांची एकाच दिवशी हत्या करण्यात आली होती. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news