• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • संतापजनक! नराधम पुजाऱ्याने पत्नीला जिवंत जाळलं, संशयावरून केली हत्या

संतापजनक! नराधम पुजाऱ्याने पत्नीला जिवंत जाळलं, संशयावरून केली हत्या

पत्नीच्या (Wife) चारित्र्यावर (character) संशय घेणाऱ्या पुजाऱ्याने (Priest) तिला बेदम मारहाण करून पेटवून दिल्याची (Burned alive) घटना उघड झाली आहे.

 • Share this:
  रायपूर, 16 सप्टेंबर : पत्नीच्या (Wife) चारित्र्यावर (character) संशय घेणाऱ्या पुजाऱ्याने (Priest) तिला बेदम मारहाण करून पेटवून दिल्याची (Burned alive) घटना उघड झाली आहे. अगोदर या पुजाऱ्याने पत्नीसोबत वाद घातला, त्यानंतर हाताला लागेल त्या गोष्टीने तिला बेदम चोप दिला. मग अर्धमेल्या झालेल्या पत्नीला पेटवून देऊन तिचा खून केला. हे सगळं घडलं केवळ त्याच्या मनात असणाऱ्या संशयावरून. संशयावरून भांडणं छत्तीसगडमधील बलौदा बाजार भागात काळीज पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. 35 वर्षांचा रामनारायण पांडेय या साई मंदिराचा पुजारी आहे. त्याची 25 वर्षांची पत्नी मंदाकिनीसोबत सतत भांडणं होत असत. या दांपत्याला दोन मुलं आहेत. त्याशिवाय मेहुणा आणि मेहुणीदेखील त्यांच्यासोबत राहायचे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर रामनारायणला संशय होता. त्यावरून त्या दोघांमध्ये सतत वाद आणि भांडणं होत असत. अमानूष मारहाण घटनेच्या दिवशी सकाळपासूनच रामनारायण आणि मंदाकिनी यांच्यात वाद होत होते. त्यानंतर या पुजाऱ्याने पत्नीला बेदम मारहाण केली. दुपारपर्यंत तो पत्नीला मारहाण करत होता. त्यानंतर काही कामासाठी तो बाहेर गेला. रात्री नऊ वाजता तो परत घरी आला. घरी आल्यावर त्याने पुन्हा पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. हातात येईल ती गोष्ट घेऊन तो पत्नीवर वार करत राहिला. हे वाचा - मंत्र्यांनी दिली होती एनकाउंटरची धमकी, रेल्वे रुळावर सापडला आरोपीचा मृतदेह यामुळे अर्धमेल्या झालेल्या पत्नीच्या अंगावर त्याने पेटलेली गॅस शेगडी ठेवली. त्यामुळे तिच्या कपड्यांनी आणि अंथरुणाने पेट घेतला. घरात त्यावेळी मेहुणा, मेहुणी आणि लहान मुलं होती. त्यांनी पुजाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणी मध्यस्थी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. गॅस शेगडीच्या साहाय्याने त्याने पत्नीला पेटवून दिले. घरातील धूर बाहेर गेल्यानंतर शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि पोलिसांना याची कल्पना दिली. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मंदाकिनी जळाली होती. पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुजारी रामनारायणविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
  Published by:desk news
  First published: