• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नमस्ते मावशी...मी सीमाचा मुलगा... स्कुटीवर लिफ्ट देतो सांगत महिलेला हातोहात लुटलं; तान्ह्या बाळाचेही हाल!

नमस्ते मावशी...मी सीमाचा मुलगा... स्कुटीवर लिफ्ट देतो सांगत महिलेला हातोहात लुटलं; तान्ह्या बाळाचेही हाल!

एका महिला सफाई कर्मचाऱ्याची (sanitation worker) नराधमाकडून करण्यात आलेली फसवणूक सुन्न करणारी आहे.

 • Share this:
  लखनऊ, 29 जुलै : एका महिला सफाई कर्मचाऱ्याची (sanitation worker)  नराधमाकडून करण्यात आलेली फसवणूक सुन्न करणारी आहे. ही महिला (Woman) तिच्या तान्ह्या बाळाला (Baby) घेऊन बसस्टॉपवर उभी होती. त्याचवेळी दुचाकीवरून (Two Wheeler) आलेल्या एका तरुणानं तिच्याजवळ येत, तिच्या पाया पडत तिला गाडीवरून सोडण्याची तयारी दाखवली. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही महिला गाडीवर बसली, मात्र तिचा घात झाला. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात कल्याणपूर नावाच्या गावात हा प्रकार घडला. ही महिला तिच्या बाळाला घेऊन बस पकडण्याच्या तयारीत होती. मात्र ती बस स्टॉपवर पोहोचण्याच्या काही क्षण अगोदरच बस निघून गेली. त्यामुळे हताश झालेली आणि धावपळ करून थकलेली ही महिला बसस्टॉपवरच उभी होती. तेवढ्यात काळं हेल्मेट घातलेला एक तरुण स्कुटीवरून येऊन तिथं थांबला. स्कुटीवरून उतरून त्यानं तिला पायाला हात लावून नमस्कार केला. मी सीमाचा मुलगा आहे, असं सांगत तिच्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्कुटीवरून तिला बसपर्यंत सोडण्याची तयारी त्यानं दाखवली. तुम्ही स्कुटीवर बसा, मी बसला ओव्हरटेक करून पुढच्या स्टॉपला तुम्हाला सोडतो, तिथून तुम्ही बस पकडा, असं त्यानं सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही महिला स्कुटीवर बसली. या तरुणानं तिची बॅग स्वतःकडे घेतली आणि स्कुटीवर ती पुढच्या भागात ठेऊन दिली. काही अंतर गेल्यानंतर पेट्रोल संपल्याचं कारण देत त्यांनं पेट्रोल पंपाच्या बाहेर गाडी उभी केली आणि महिलेला उतरायला सांगितलं. आपण पेट्रोल भरून येऊ, असं सांगत त्यानं तिथून पोबारा केला. या महिलेची बॅग घेऊन तो चोरटा पळून गेला. त्या बॅगेत महिलेच्या ऑफिसची कागदपत्रं, 10 हजार रुपये आणि बाळाच्या दुधाची बाटली होती. हे वाचा -इंधनवाढीचा सामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सरकारनं दिलं हे स्पष्टीकरण महिलेनं 112 नंबरवर कॉल करत पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या स्कुटीचालकाचा ते शोध घेत आहेत.
  Published by:desk news
  First published: