• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • इलाज करता करता जुळलं प्रेम, अल्पवयीन तरुणी 24 वर्षांच्या भोंदू बाबासोबत पळाली

इलाज करता करता जुळलं प्रेम, अल्पवयीन तरुणी 24 वर्षांच्या भोंदू बाबासोबत पळाली

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सतत आजारी पडणाऱ्या (ill) तरुणीवर उपचार करता करता एका बाबाचं (baba) आणि अल्पवयीन तरुणीचं (minor) एकमेकांवर प्रेम (love affair) जडलं.

 • Share this:
  जयपूर, 22 ऑगस्ट : सतत आजारी पडणाऱ्या (ill) तरुणीवर उपचार करता करता एका बाबाचं (baba) आणि अल्पवयीन तरुणीचं (minor) एकमेकांवर प्रेम (love affair) जडलं. हळूहळू त्यांच्यातील संपर्क (communication) वाढत गेला आणि एक दिवस घरच्यांना न सांगता ही तरुणी बाबासोबत पळून (ran away) गेल्याची घटना समोर आली आहे. असं जुळलं प्रेम राजस्थानमधील हुडील गावातील एक तरुणी सतत आजारी असायची. तिच्या तब्येतीची काही ना काही तक्रार सुरू असायची. त्यावर उपाय करण्यासाठी तिचे वडिल एका भोंदू बाबाकडे तिला घेऊन गेले. 24 वर्षांच्या त्या बाबाने तिच्यावर उपचार सुरू करत असल्याचा दावा केला. त्यानंतर ते संधी मिळेल, तेव्हा एकमेकांना भेटत राहिले. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. बाबा आणि अल्पवयीन तरुणी दररोज तासनतास मोबाईलवर बोलत राहायचे. घरातून पलायन एक दिवस वडिल घराबाहेर असताना आणि शेतात गेली असताना मुलीने स्वतःचं आधारकार्ड आणि दोन ड्रेस घेऊन घरातून पळ काढला. आई घरी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला. मुलीने फाईलमधील स्वतःचे आधार कार्ड आणि काही कपडे सोबत नेल्याचं लक्षात आलं. तिने मुलीच्या वडिलांना फोनवरून ही घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत या बाबाविरोधात तक्रार नोंदवल्याची बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. आपली मुलगी अल्पवयीन असल्याचंही या तक्रारीत वडिलांनी म्हटलं आहे. अर्थात, ती अल्पवयीन आहे हे सिद्ध करणारी कागदपत्रं अजून पोलिसांना मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे वाचा -भयंकर ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न मुलीने पळून जाताना आपला पाठलाग होऊ नये, याची तजवीज केल्याचं दिसलं. वडिलांच्या मोबाईलमध्ये असणारा बाबाचा फोन नंबर आणि काही फोटो या मुलीनं डिलिट केले होते. त्याचप्रमाणं स्वतःचं आधार कार्डदेखील ती सोबत घेऊन गेली आहे. पोलिसांनी या प्रकऱणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.
  Published by:desk news
  First published: