Home /News /crime /

अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी विवाहित शिक्षिकेला अटक, वाचा काय आहे प्रकरण

अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी विवाहित शिक्षिकेला अटक, वाचा काय आहे प्रकरण

खासगी शिकवणीच्या (Private tuition) बहाण्याने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर (14 year old boy) बलात्कार (Rape) केल्याप्रकऱणी एका शिक्षिकेला (Teacher) अटक (Arrest) करण्यात आली आहे.

    कॅलिफोर्निया, 5 सप्टेंबर : खासगी शिकवणीच्या (Private tuition) बहाण्याने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर (14 year old boy) बलात्कार (Rape) केल्याप्रकऱणी एका शिक्षिकेला (Teacher) अटक (Arrest) करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला शिकवणी देत असताना त्याच्या लैंगिक भावना उद्दिपित करून त्याच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप या शिक्षिकेवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून 39 वर्षांच्या विवाहित शिक्षिकेविरोधात कारवाई सुरु केली आहे. अशी घडली घटना कॅलिफोर्नियामध्ये प्रायव्हेट टीचर म्हणून काम करणारी क्रिस्टल जॅकसन (Krystal Jackson) ही एका 14 वर्षांच्या मुलाला शिकवणी देत होती. ही शिक्षिका मुलावर लैंगिक अत्याचार करत असल्याची खबर कॅलिफोर्नियाच्या इंटरनेट क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन (ICAC) या संस्थेला मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला. शुक्रवारी या प्रकरणात क्रिस्टलला अटक करण्यात आली. ती सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस तिच्याकडून याविषयी अधिक माहिती घेत आहेत. या मुलाव्यतिरिक्त इतरही अनेक मुलांच्या घरी जाऊन क्रिस्टल शिकवणी घेत असे. इतर कुणासोबत तिने असा प्रकार केला आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मुलगा सुरक्षित ज्या मुलाच्या बाबतीत क्रिस्टलने हा प्रकार केला, तो सुरक्षित असून त्याच्या तब्येतीवर कुठलाही विपरित परिणाम झालेला नाही. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार अल्पवयीन तरुण किंवा तरुणीसोबत त्यांच्या संमतीने किंवा संमतीविना लैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा आहे. पोलिसांनी क्रिस्टलविरोधात बलात्कार, लैंगिक भावना उद्दिपित करणे, अल्पवयीन मुलासोबत लैंगिक चाळे करणे, लैंगिक अवयवांना दुखापत करण्याचा प्रयत्न करणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. हे वाचा - कोरोना प्रतिबंधक निर्बंधांवरुन ठाकरे बंधुंमध्ये जुंपली या विद्यार्थ्यावर क्रिस्टलने गेल्या एका वर्षात तीन वेळा बलात्कार केल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांकडे पालक विश्वासाने आपल्या विद्यार्थ्याला सोपवतात, त्या शिक्षिकेनेच असं घृणास्पद कृत्य केल्यामुळे शिक्षकी पेशालाच काळीमा फासला गेल्याची भावना कॅलिफोर्नियात निर्माण झाली आहे. या प्रकऱणाचा पोलीस तपास करत असून क्रिस्टलवर काय कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Rape

    पुढील बातम्या