मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या, भर रस्त्यात केले कुऱ्हाडीचे वार

चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या, भर रस्त्यात केले कुऱ्हाडीचे वार

 रस्त्यावर बसलेली महिला ही चेटकीण (A man murders woman suspecting as a witch) असल्याच्या संशयावरून एका माथेफिरूनं महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.

  • Published by:  desk news
पटना, 17 ऑक्टोबर : रस्त्यावर बसलेली महिला ही चेटकीण (A man murders woman suspecting as a witch) असल्याच्या संशयावरून एका माथेफिरूनं महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. ही महिला मोलमजुरी (Worker woman killed by psycho) करून आपला चरितार्थ चालवत होती. रोजच्याप्रमाणं कामावर जात असताना एका माथेफिरूने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिची हत्या केली. अशी झाली हत्या बिहारच्या आजमनगर परिसरात दूधिया देवी नावाची महिला मजुरीची कामं करून चरितार्थ चालवत होती. गावातीलच बेचन ऋषी एका व्यक्तीला दूधिया ही चेटकीण असल्याचा संशय होता. गेल्या काही दिवसांपासून ऋषी महिलेवर पाळत ठेऊन होता आणि तिचा पाठलाग करत होता. घटनेच्या दिवशी दूधिया देवी सकाळी 8 वाजता कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. तिच्यासोबत येणाऱ्या इतर महिलांची वाट पाहत ती रस्त्यावर थांबली होती. तेवढ्यात तिच्यावर पाळत ठेऊन असलेला बेचन ऋषी हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यापाशी आला. तिला काही समजायच्या आतच ऋषीने तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. घाव वर्मी बसल्यामुळे दूधिया देवीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली आणि हल्लेखोर ऋषीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ला केल्यानंतर पळून जाण्यात ऋषी यशस्वी ठरला. पतीने नोंदवली तक्रार दूधिया देवीच्या पतीला या घटनेमुळे जबर धक्का बसला आहे. कुठलंही वैयक्तिक वैमनस्य नसताना आपल्या पत्नीच्या झालेल्या हत्येमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दूधिया देवी चेटकीण असल्याच्या केवळ संशयावरून एका माथेफिरू इसमाने हत्या केल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. पोलिसांनी बेचन ऋषीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
First published:

Tags: Bihar, Crime, Murder

पुढील बातम्या