• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • प्रेमप्रकरणातून तरुणाचा मृत्यू, तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून भरवलं विष

प्रेमप्रकरणातून तरुणाचा मृत्यू, तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून भरवलं विष

प्रेमप्रकरणात एका तरुणाला (A man allegedly killed as honor killing by family of his girlfriend) तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून विष भरवल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  रांची, 16 नोव्हेंबर: प्रेमप्रकरणात एका तरुणाला (A man allegedly killed as honor killing by family of his girlfriend) तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून विष भरवल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध मान्य नसलेल्या (Family of girl beaten youth to death) तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला धडा शिकवण्याच्या इराद्यानं त्याला नियोजनपूर्वक मारहाण केली आणि जबरदस्तीनं त्याला विष भरवलं. यामुळं तरुणाचा मृत्यू झाला आहे. काय आहे प्रकार? झारखंडमधील दुमका भागात ऑनर किलिंगचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. या भागात मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विवेक कुमार साह याचं एका मुलीसोबत अफेअर सुरू होतं. शेजारच्या गावात राहणाऱ्या या मुलीचंही विवेकवर प्रेम होतं आणि दोघांनी लग्न करण्याची तयारी केली होती. दोघांच्याही घरच्यांना ही बाब माहित होती, मात्र मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. पोलीस ठाण्यात तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांच्याही घरच्यांना बोलावून घेत तरुणाला समज दिली होती. त्याच्याकडून बॉंडवर सहीदेखील करून घेण्यात आली होती. या प्रकारामुळे दोन्ही कुटंबीयांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तरुणीच्या नंबरवरून आला कॉल घटनेच्या दिवशी तरुणाला तरुणीच्या नंबरवरून फोन आला. त्याला घरी बोलावण्यात आलं. घरी पोहोचल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीनं त्याच्या तोंडात विष कोंबण्यात आलं. या अवस्थेत तरुण कसाबसा घरी पोहोचल्यावर त्याला तातडीनं उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते, तर तो वाचू शकला असता, असा दावा विवेकच्या वडिलांनी केला आहे. हे वाचा- कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश! पोलीस तपास सुरू विवेकनं मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात तरुणीच्या कुटुंबीयांचं नाव घेतलं असलं तरी पोलीस सध्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतर कुटुंबीयांना अटक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पोलीस कारवाई करण्याबाबत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
  Published by:desk news
  First published: