पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली महिला कॉन्स्टेबल, लग्नाला नकार देताच उचललं टोकाचं पाऊल

पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली महिला कॉन्स्टेबल, लग्नाला नकार देताच उचललं टोकाचं पाऊल

कुंदन यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे श्रुती या डिप्रेशनमध्ये गेल्याचं तिच्या पतीने सांगितलं आहे.

  • Share this:

पाटना 6 सप्टेंबर: बिहारमधल्या अररिया जिल्ह्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अररिया जवळचया सिमराहा पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला कॉन्स्टेबलचं आणि तिथल्या स्टेशन ऑफिसरचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्या अधिकाऱ्याने लग्नाचं आमीष दाखवलं होतं. त्याने नकार देताच त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. किंग कुंदन असं त्या स्टेशन ऑफिसरचं नाव असून श्रुती कुमारी असं पीडीत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.

कुंदन आणि श्रृती एकाच पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. तिथेच त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. दोघही विवाहित होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सर्व अधिकाऱ्यांमध्ये सुरु होती. नंतर कुंदन यांची दुसऱ्या स्टेशनमध्ये बदली झाली.

मात्र दोघांचेही संबंध सुरुच होते. कुंदन यांनी श्रुतीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे श्रुतीने पतीला घटस्फोट देण्याची तयारीही केली होती. आपण कुंदन यांच्यासोबतच राहणार असल्याचं तिने पतीलाही सांगितलं होतं.

Love Marriageकरून पत्नीला फसवलं, 8 महिन्यात उघडकीस आलं धक्कादायक वास्तव

मात्र नंतर कुंदन यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे श्रुती या डिप्रेशनमध्ये गेल्याचं तिच्या पतीने सांगितलं. त्यामुळेच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं पुढे आलं आहे.

गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिचे कुटुंबीय तिला फोन करत होते मात्र ती काही फोन उचलत नव्हती. त्यानंतर जेव्हा त्यांनी तिच्या खोलीचं दार उघडलं तेव्हा तिने पंख्याला दोर बांधून गळफास घेतल्याचं आढळून आलं होतं.

कापड व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा 24 तासांत उलगडा, समोर आलं ते भयंकर!

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून कुंदन यांना तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. कुंदन यांच्या अटकेचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी गेले त्या आधीच ते फरार झाले होते.  पोलिसांनी आता विशेष पथक स्थापन केलं असून कुंदन यांचा शोध सुरु आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 6, 2020, 7:21 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या