मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पर्स चोरणाऱ्या तिघांना एकट्या तरुणीने घडवली अद्दल, बाईकचा पाठलाग करून चोरट्यांना खेचले खाली

पर्स चोरणाऱ्या तिघांना एकट्या तरुणीने घडवली अद्दल, बाईकचा पाठलाग करून चोरट्यांना खेचले खाली

कामावरून घरी जात असताना पर्स चोरून (Purse theft) पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना (Three thieves) एका तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली आहे.

कामावरून घरी जात असताना पर्स चोरून (Purse theft) पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना (Three thieves) एका तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली आहे.

कामावरून घरी जात असताना पर्स चोरून (Purse theft) पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना (Three thieves) एका तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली आहे.

जालंधर, 19 ऑगस्ट : कामावरून घरी जात असताना पर्स चोरून (Purse theft) पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना (Three thieves) एका तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली आहे. तीन चोरट्यांशी सामना असतानाही न घाबरता या तरुणीनं त्यांचा पाठलाग (Chase) केला आणि त्यांना बाईकवरून खाली खेचलं. या घटनेनंतर तरुणीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अशी घडली घटना

पंजाबमधील जालंधरमध्ये सिमरनदीप कौर ही एका गिफ्ट गॅलरीत नोकरी करते. रात्री पावणे नऊच्या सुमाराला आपलं काम संपवून ती घरी चालली होती. तेवढ्यात पाठीमागून बाईकवरून आलेल्या तिघांनी तिची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. तिनं आपली पर्स घट्ट पकडून ठेवली आणि आपल्या हातातून ती सुटू दिली नाही. या तरुणांनी तिने पर्स सोडावी, यासाठी बाईकचा वेग वाढवला, मात्र आपल्या पर्सचा बेल्ट पकडून सिमरन त्यांच्यासोबत धावू लागली. काही वेळानंतर तिने बाईकवर सर्वात मागे बसलेल्या तरुणाची कॉलर पकडून त्याला खाली खेचलं आणि बाईकच्या मागच्या चाकावर जोरदार लाथ मारली. त्यामुळे बाईक चालवणाऱ्याचाही बॅलन्स गेला आणि बाईकवरील तिघेही खाली कोसळले.

हा प्रकार पाहणाऱ्या आसपासचे लोक त्यामुळे गोळा झाले आणि त्यांनी तरुणांना पकडले. तिघांपैकी दोघांना जमावाने पकडून ठेवले, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.

हे वाचा -पत्नीवर उकळतं पाणी फेकत त्याने गाठला विक्रूतीचा कळस, समोर आलं संतापजनक कारण

शाळेपासून धावण्याचा सराव

आपण शालेय जीवनापासूनच धावपटू असल्याचं सिमरननं सांगितलं. आपल्याला गुंडांची भिती वाटली नाही असं सांगताना आपण धडा शिकवला नसता, तर पुढच्या वेळी आणखी एखाद्या तरुणीसोबत त्यांनी असा प्रकार केला असता, असं सिमरन म्हणते. सिमरनच्या या धाडसाचं सध्या जोरदार कौतुक होत आहे.

First published:

Tags: Crime, Punjab