• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लग्नाचं अमिष दाखवून घरमालकिणीसोबत शारीरिक संबंध, शब्द फिरवल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचं अमिष दाखवून घरमालकिणीसोबत शारीरिक संबंध, शब्द फिरवल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचं (Marriage) अमिष दाखवून घरमालकिणीसोबत शारीरिक संबंध (Physical relations) ठेवणाऱ्या आणि नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

 • Share this:
  रायपूर, 10 सप्टेंबर : लग्नाचं (Marriage) अमिष दाखवून घरमालकिणीसोबत शारीरिक संबंध (Physical relations) ठेवणाऱ्या आणि नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. घरमालकिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. त्यानंतर दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. अशी झाली ओळख छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात जितेंद्र पटेल या तरुणाने ऑक्टोबर 2018 मध्ये एक घर भाड्याने घेतले. या घराची मालकिणीसोबत त्याची ओळख हळूहळू वाढत गेली. काही दिवसांतच या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. हळूहळू त्यांच्यातील शारीरिक जवळीकही वाढत गेली. तरुणाने घरमालकिणीला लग्नाचं आश्वासन दिलं. मधल्या काळात त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर तरुण लग्नाबाबत टाळाटाळ करत असल्याचं तरुणीला जाणवू लागलं. लग्नासाठी टाळाटाळ जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2021 या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर मात्र तरुणाने घरमालकिणीपासून दूर राहायला सुरुवात केली. लग्नाचा विषय काढला की तो मुद्दा टाळून विषयांतर करत असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. एकदा तरुणीने जाणीवपूर्वक हा विषय काढला आणि त्याला उत्तर देण्यास भाग पाडलं. त्यावर आपल्याला लग्न करण्याची इच्छा नसून आपण ही जागा सोडून जात असल्याचं तरुणानं सांगितलं. त्यानंतर त्याने ते घर सोडून दुसरीकडे घर घेतलं. हे वाचा -जे माणसांना जमलं नाही ते माकडांनी केलं; विहिरीत पडलेल्या महिलेचा असा लावला शोध गुन्हा दाखल आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जितेंद्रचा शोध घेऊन त्याला अटक केली. जितेंद्रविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: