मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बायकोचा केला खून आणि सांगितलं कोरोनानं मेल्याचं कारण, एका बॅगमुळे झाला उलगडा

बायकोचा केला खून आणि सांगितलं कोरोनानं मेल्याचं कारण, एका बॅगमुळे झाला उलगडा

तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पत्नीचा थंड डोक्यानं खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याची घटना नुकतीच तिरुपतीमध्ये उघडकीला आल्यामुळे एकच खळळ उडाली आहे.

तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पत्नीचा थंड डोक्यानं खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याची घटना नुकतीच तिरुपतीमध्ये उघडकीला आल्यामुळे एकच खळळ उडाली आहे.

तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पत्नीचा थंड डोक्यानं खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याची घटना नुकतीच तिरुपतीमध्ये उघडकीला आल्यामुळे एकच खळळ उडाली आहे.

  • Published by:  desk news

तिरुपती, 30 जून : तिरुपतीमध्ये (Tirupati) राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पत्नीचा (Wife) थंड डोक्यानं खून करून (Cold Blooded Murder) तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याची घटना नुकतीच तिरुपतीमध्ये उघडकीला आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती पोलिसांना (Tirupati Police) सापडलेल्या शरीराच्या काही अवशेषांवरून या हत्येचा उलगडा झाला आणि नराधम पतीच्या कृत्यांचा पर्दाफाश झाला.

नेमकं काय घडलं?

श्रीकांत रेड्डी आणि भुवनेश्वरी हे पती-पत्नी त्यांच्या दीड वर्षांच्या बमुलीसोबत तिरुपतीमध्ये राहत होती. भुवनेश्वरी ही हैदराबादमधील कॉग्निझंट कंपनीत काम करत होती. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम स्वरुपाचं काम असल्यामुळं दोघंही तिरुपतीमध्येच राहत होते. श्रीकांत हा भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या एका संस्थेत कार्यरत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली असल्यामुळे तो बेरोजगार होता. पती-पत्नीमध्ये याच मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर श्रीकांतचे थंड डोक्याने पत्नीचा खून केल्याची माहिती मिळत आहे.

'ट्रॉली बॅग'मुळे झाले उलगडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा खून केल्यानंतर श्रीकांतने रिलायन्स मार्टमध्ये जाऊन लाल रंगाची मोठी ट्रॉली बॅग विकत घेतली. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्रीकांत ही बॅग घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. त्याच्या कडेवर त्याची दीड वर्षांची मुलगीदेखील आहे. आपल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे याच बॅगेत भरल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळेच ती बॅग उचलणं आणि ओढणं त्याला जड जात असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

शरीराचे तुकडे करून जाळले

थंडपणे आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर श्रीकांतचे तितक्याच निर्दयीपणे तिच्या शरीराचे तुकडे करून ते जाळण्याचा प्रयत्न केला. कुठलाही पुरावा राहू नये, यासाठी त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शरीरातील काही हाडं सोडली, तर बहुतांश शरीर हे श्रीकांतनं जाळून टाकलं.

पत्नी कोरोनाने मेल्याचा बनाव

आपली पत्नी कोरोनाने मरण पावली, असं श्रीकांतनं नातेवाईकांना सांगितलं. रुग्णालयातून परस्पर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याचं सांगून आपण या खुनातून सहिसलामत बाहेर पडलो, या भ्रमात तो अनेक दिवस राहत होता. मात्र नातेवाईकांनी भुवनेश्वरीचा शोध सुरूच ठेवला. कुठल्याच रुग्णालयात भुवनेश्वरीचं रेकॉर्ड नसल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी बारकाईने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला.

First published:

Tags: Murder Mystery, Wife and husband