Home /News /crime /

दिवसभर नवरा-बायकोचं भांडण, रात्री झाला खून, फरार पतीचा शोध सुरू

दिवसभर नवरा-बायकोचं भांडण, रात्री झाला खून, फरार पतीचा शोध सुरू

पती आणि पत्नीमध्ये घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान खुनात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून करून पती फरार झाला आहे.

    चंदीगड, 12 जुलै : हरियाणातील (Haryana) बहादूरगडमध्ये पती आणि पत्नीमध्ये (Husband andWife) घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान खुनात (Murder) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आपल्या पत्नीच्या पोटात चाकूचे वार (Stabbed) करून फरार झालेल्या पतीचा पोलीस शोध घेत आहेत. रविवारी दिवसभर या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. हे भांडण वाढत गेलं आणि राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा खून केला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. असं फुटलं वादाला तोंड रिक्षाचालक योगेश आणि त्याची पत्नी संगीता हा दोघं बदाहूरगडच्या संत कॉलनी परिसरात राहणाऱ्या जोडप्यात रविवारी सकाळी एका घरगुती विषयावरून भांडणाला सुरुवात झाली. घरात त्यांची 10 वर्षांची मुलगीदेखील होती. मुलगी आतल्या खोलीत होती आणि बाहेरच्या खोलीत पती-पत्नीचं जोरदार भांडण सुरू होतं. पाहता पाहता हे भांडण विकोपाला गेलं. त्यानंतर रागच्या भरता पती योगेशनं पत्नीच्या पोटात चाकू खुपसला आणि घराच्या दाराला बाहेरून कडी लावून तो फरार झाला. विव्हळणाऱ्या आईचा आवाज ऐकून मुलगी बाहेर आली. खिडकीतून आरडाओरडा करून तिनं शेजाऱ्यांना दार उघडायला सांगितलं. दार उघडल्यानंतर जखमी संगिताला हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं. मात्र तेव्हा संगिताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा गोंधळ ऐकून आपल्या वहिनीला वाचवण्यासाठी तिच्या दिरानं प्रयत्न केले खरे, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पहिल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. मात्र तिथं पोहोचल्यावर संगिताचा मृत्यू झाला असल्याचं जाहीर करण्यात आलं. हे वाचा-पुणे: KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात पोलीस तपास सुरू पोलिसांनी संगिताच्या 10 वर्षांच्या मुलीची जबानी घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रिक्षाचालक असणाऱ्या योगेशला लवकराच लवकर शोधून काढू, असा दावा पोलिसांनी केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Haryana, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या