Home /News /crime /

धक्कादायक! दूरदर्शन केंद्रातील महिला टॉयलेटमध्ये छुपा मोबाइल कॅमेरा; असा झाला खुलासा

धक्कादायक! दूरदर्शन केंद्रातील महिला टॉयलेटमध्ये छुपा मोबाइल कॅमेरा; असा झाला खुलासा

अनेक कलाकार, राजकीय नेते, विद्यार्थी सह समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती दूरदर्शनच्या या केंद्रात येत असतात.

    तिरूवनंतपुरम, 11 नोव्हेंबर : केरळमधील (Kerala News) तिरूवनंतपुरममधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील दूरदर्शन केंद्रातील महिला शौचालयात लपवलेला एक कॅमेरा सापडला आहे. यानंतर तेथे खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शौचालयात कॅमेरा असल्याचा संशय आल्यानंतर येथील एका महिलेने तपास केला. त्यानंतर याबाबत खुलासा झाला. यानंतर अधिकाऱ्यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. हा आरोपी करार तत्वावर येथे काम करतो. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे. या तरुणाने हा कॅमेरा मुख्य स्टुडिओजवळील शौचालयात लावला होता. सांगितलं जात आहे की, अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला होता. (A hidden mobile camera in a womens toilet at a doordarshan Thiruvananthapuram centre) हे ही वाचा-मृत समजून भलत्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार; पोलीस-डॉक्टरांचा सावळागोंधळ व्यक्तीला नोकरीवरुन हटवलं.. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मोबाइल कॅमेरा शौचालयात लपवण्यात आला होता. त्या आरोपीला तत्काळ नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. VIP स्टाफदेखील करतात याच शौचालयाचा वापर.. या टॉलटेलचा वापर अनेक VIP आणि स्टाफ करतात. सांगितलं जात आहे की, अनेक कलाकार, राजकीय नेते, विद्यार्थी सह समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती दूरदर्शनच्या तिरुवनंतपूरम केंद्रात येतात. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण सर्वात आधी महिला आणि अनुशासन समितीकडे पाठवण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala

    पुढील बातम्या