कापवरम, 12जानेवारी : प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो असं म्हणतात. मात्र हे आंधळेपण अनेकदा विकृतीचं टोक गाठताना दिसतं. अशीच एक घटना आंध्र प्रदेशाच्या (Andhra Pradesh) एका लहानशा खेड्यातून (village) सोमवारी समोर आली आहे.
कापवरम व्हिलेज या आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात (Godavari District) ही घटना घडली आहे. एका तरुणाची त्याच्या गर्लफ्रेंडनं (girlfriend) क्रूरपणे हत्या (murder) केली आहे. हा तरुण इतर कुणावर तरी प्रेम करतो असा या तरुणीला संशय होता. कापवरम आणि भरमावरम जिल्ह्यांच्या मध्ये एका ठिकाणी ही घटना घडली आहे. हे ठिकाण पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या कोवूर तालुक्यामध्ये येतं.
लोकल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी गार्सीकुती पावनी (२२) आणि मुलगा अंबाती करुणा ताताजी नायडू (२५) हे दोघं ताडेपल्लीगुडेम पाथुर या गावाचे राहणारे आहेत. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, ताताजी नायडू हा सतत लग्नाला (marriage) नकार देत होता. पावनी त्याच्याकडे सतत लग्नासाठी मागणी करत होती.
हे असं चित्र असताना ताताजी एका दुचाकीवर (two wheeler) सोमवारी दुपारी पनगिडी इथं आला. पावनी त्याला भेटण्यासाठी मलकापल्ली इथून गेली होती. दोघेही गाडीवर रात्र होईपर्यंत फिरत राहिले. रात्री ताताजी पावनीला परत सोडण्यासाठी मलकापल्ली इथं जात होता. मागं बसलेल्या पावनीनं अचानक बॅगमधून चाकू काढला आणि ताताजीच्या पाठीत खुपसला.
ताताजी अचानक गाडी चालवताना झालेल्या या हल्ल्यामुळं खाली कोसळला. पावनीनं खाली पडलेल्या ताताजीच्या मान, डोकं आणि पाठीवर पुन्हापुन्हा वार केले. गंभीर रक्तस्त्रावामुळं ताताजी जागेवरच ठार झाला. बाजूनं चाललेल्या काही लोकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी लगोलग गावातील पोलिसांना हे कळवलं. पोलिसांनी करत पुढचा तपास सुरू केला आहे.