Home /News /crime /

Shocking Video: जवळ उभा असूनही CISF जवान नाही वाचवू शकले प्राण; मेट्रो स्टेशनवरुन उडी घेतलेली तरुणी कोण?

Shocking Video: जवळ उभा असूनही CISF जवान नाही वाचवू शकले प्राण; मेट्रो स्टेशनवरुन उडी घेतलेली तरुणी कोण?

मृत तरुणीजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता, ते आता दिल्लीला पोहोचले आहेत

    नवी दिल्ली 15 एप्रिल : दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्थानकावरून गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उडी घेतलेल्या (Girl Jumped from Akshardham Metro Station) तरुणीचा रात्री दहाच्या सुमारास लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या शरीरात मल्टिपल फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला वाचवणं शक्य झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिया असं आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणीचं नाव आहे (Girl Committed Suicide). ती पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी होती. दिया गुरुग्राममध्ये काम करत होती आणि काही दिवसांपूर्वी तिची नोकरी गेली होती. मृत तरुणीजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता, ते आता दिल्लीला पोहोचले आहेत. मात्र, त्यांनाही आपल्या मुलीच्या आत्महत्येचं कारण तेदेखील पोलिसांना सांगू शकले नाहीत. Nashik Crime : आधी पत्नीवर गोळीबार, नंतर स्वत:ला संपवलं, पतीने इतकं भयानक कृत्य का केलं? ही तरुणी मेट्रो स्थानकावरून उडी घेत असताना तिथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अनेक जवान उपस्थित होते. ही तरुणी मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढत असल्याचं पाहून लगेचच सीआयएसएफचे पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनीही तिला रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र तिने कोणाचंही ऐकलं नाही. यामध्ये सीआयएसएफ जवानांनी हुशारीनं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला काही जवान चादर घेऊन पोहोचले. सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अखेर या तरुणीने भिंतीवरून उडी घेतलीच. मात्र, खाली उभ्या असलेल्या जवानांनी तिला चादरीवर पकडलं. मात्र हे सगळे प्रयत्न करुनही या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Love Marriage च्या दुसऱ्या दिवशी पतीची पत्नीकडून विचित्र मागणी; 2 मित्रांसमोर घडलं भयंकर कृत्य मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी दिव्यांग होती. तिला बोलताही येत नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तिने कोणत्या कारणास्तव उडी मारली आणि इतकं मोठं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेनंतर सगळेच सीआयएसएफ जवानांचं कौतुक करत होते. जवानांनी या तरुणीचा जीव वाचवल्याने त्यांच्या सतर्कतेविषयीच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र, या तरुणीने रात्री उपचारादरम्यान आपला जीव गमावला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Suicide news

    पुढील बातम्या