मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकरानं दिला प्रेमात दगा, प्रेयसीनं उलललं टोकाचं पाऊल

प्रियकरानं दिला प्रेमात दगा, प्रेयसीनं उलललं टोकाचं पाऊल

प्रियकरानं दिला प्रेमात दगा, प्रेयसीनं उलललं टोकाचं पाऊल

प्रियकरानं दिला प्रेमात दगा, प्रेयसीनं उलललं टोकाचं पाऊल

प्रेमात फसवणूक झाल्याने दु:खी झालेल्या तरुणीने मृत्युला कवटाळलं. मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोटही लिहिली असून, यामध्ये तिच्या प्रियकराने कशा पद्धतीने तिची फसवणूक केली, हे सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 सप्टेंबर: तरुण वयात प्रेम होतं ही स्वाभाविक घटना आहे. पण अनेकदा मुलं मुलींना किंवा मुलीही मुलांना सोडून देतात. असा दगा दिल्यावर ती व्यक्ती हा मानसिक धक्का सहन करू शकत नाही आणि आपल्या जीवाचं बरंवाईट करून घेते. असंच काहीसं उत्तर प्रदेशात घडलं आहे. प्रियकराने दगा दिल्याने 18 वर्षीय प्रेयसीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (26 सप्टेंबर 2022) उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील एका गावात घडली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये संबंधित मृत मुलीने तिच्या प्रियकराचं नाव लिहिलं असून पोलिसांनी त्याच्या शोध सुरू केलाय.

प्रेमात फसवणूक झाल्याने दु:खी झालेल्या तरुणीने मृत्युला कवटाळलं. मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोटही लिहिली असून, यामध्ये तिच्या प्रियकराने कशा पद्धतीने तिची फसवणूक केली, हे सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील 18 वर्षीय राणीने (नाव बदलले आहे) सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी झडती घेतली असता पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्येचं कारण लिहिलं होतं.

सुसाईड नोटमध्ये लिहिलंय...

घटनास्थळावर सापडलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्या मृत्यूला प्रत्युष जबाबदार आहे. आधी त्यानं माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलं. त्यानं माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले, आणि मन भरल्यावर निघून गेला. प्लीज, तुम्ही त्याला अजिबात सोडू नका. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मरू तर शकते.’

हेही वाचा: 'या' तरुणापासून सावधान! स्वतःला म्हणतो इंजिनीअर, इमोशनल स्टोरी सांगून जाळ्यात ओढतो आणि...

गुन्हा दाखल, प्रियकराचा शोध सुरू-

या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. जी काही माहिती समोर येईल, त्यानुसार पुढील कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल. चिठ्ठीत राणीने उल्लेख केलेला प्रत्युष सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे, असंही सांगण्यात आलंय.

दोघेही राहत होते एकाच गावात-

मृत राणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, ‘प्रत्युष हा त्यांच्याच गावचा राहत होता. राणी आणि प्रत्युषचं प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होतं; पण आमची मुलगी आत्महत्येसारखं पाऊल उचलेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. तर, या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याचं पोलिसांचंही म्हणणं आहे. राणी प्रत्युषला सोबत घेऊन जाण्यास सांगत होती. मात्र प्रत्युष तिला वारंवार नकार देत होता.

दरम्यान, या प्रकाराने मात्र हरदोई जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा तपास वेगाने सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Suicide