मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दोन गे तरुणांनी मिळून तिसऱ्या गे व्यावसायिकाची केली हत्या; आधी गळा दाबला आणि मग...

दोन गे तरुणांनी मिळून तिसऱ्या गे व्यावसायिकाची केली हत्या; आधी गळा दाबला आणि मग...

हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला...

हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला...

हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला...

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 20 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) गे ट्राय अँगलमध्ये एका हत्येचं (Murder) प्रकरण समोर आलं आहे. ही घटना रायसेन जिल्ह्यातील औबेदुल्लागंज येथील आहे. येथे दोन गे मित्रांनी मिळून तिसऱ्या गे कपडे व्यापारी नीरज कोठारी (45) याची हत्या केली. कोठारीचे 17 वर्षीय मुलासोबत रिलेशन ठेवले होते. कोठारीने अल्पवयीन मुलासोबत केलेल्या दुष्कर्माचे व्हिडीओही शूट केले होते. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार त्याचे लैंगिक शोषण करीत होता.

अल्पवयीन मुलगा आणि मनोजने 16 फेब्रुवारीच्या रात्री कोठारीचा गळा दाबून हत्या केली होती. यानंतर मृतदेह तेथेच झाडांमध्येच फेकून दिला. याशिवाय त्याची स्कूटी आणि मोबाइल घेऊन पळ काढला. पोलिसांनी मोबाइल नंबर ट्रेस करूव दोघांना भोपाळमधील नादरा बस स्टँडहून अटक केली आहे.

17 फेब्रुवारी रोजी औबेदुल्लागंजच्या देवेंद्र कोठारीने पोलिसात आपला मुलगा नीरज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 4 ठाण्याचे पोलीस नीरजचा शोध घेत होते. नीरजचा मृतदेह शुक्रवारी होशंगाबाद रोड स्थित शगुन वाटिका मॅरेज गार्डनच्या मागील झाडांमध्ये मिळाला.

हे ही वाचा-आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं; सुनेसोबत क्रूरतेचा कळस

व्यापाऱ्याने दबाव आणून अल्पवयीन मुलाला बोलावलं होतं भेटायला..

एडिशनल एसपी अमृत मीणाने सांगितलं की, 23 वर्षीय आरोपी मनोज कटारे पिपलिया गावातील राहणारा आहे. अल्पवयीन स्टेशन रोडवरील एका दुकानात काम करीत होता. दोघेही रिलेशनशीपमध्ये (gay couple) होते. नीरजदेखील दुकानावर येत-जात होता. अल्पवयीन आणि मनोज रिलेशनशीपमध्ये असल्याचं कळताच तोदेखील अल्पवयीन मुलाला आपल्याकडे बोलावू लागला. सोबतच त्याचं लैंगिक शोषण करीत होता. याचा एक व्हिडीओही त्याने शूट केला होता. नीरज हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता.

नीरज अल्पवयीन मुलाला वारंवार शरीर संबंधासाठी त्रास देऊ लागला होता. त्याने मनोजला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी मिळून हत्येचा कट रचला. 16 फेब्रुवारीच्या रात्री 9.30 वाजता नीरजने अल्पवयीन मुलाला मॅरेज गार्डनच्या मागे रेल्वे ट्रॅकजवळ बोलावलं. अल्पलयीन मुलाने मनोजला याबाबत सांगितलं होत. मनोज त्याच्या मागावरच होता. दोघांनी आधी व्यावसायिकाचा गळा दाबला. यानंतर त्याच्या हाताची नस कापली. गळ्यावरही चाकून वार केले.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Murder