मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पोलिसांच्या वेषात आली आरोपींची टोळी, जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

पोलिसांच्या वेषात आली आरोपींची टोळी, जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

पोलिसांच्या वेषात (Police uniform) आलेल्या 18 ते 20 जणांच्या टोळक्याने गोळ्या घालून दोन भावांची (Murder of two brothers) हत्या केली.

पोलिसांच्या वेषात (Police uniform) आलेल्या 18 ते 20 जणांच्या टोळक्याने गोळ्या घालून दोन भावांची (Murder of two brothers) हत्या केली.

पोलिसांच्या वेषात (Police uniform) आलेल्या 18 ते 20 जणांच्या टोळक्याने गोळ्या घालून दोन भावांची (Murder of two brothers) हत्या केली.

पटना, 13 ऑगस्ट : पोलिसांच्या वेषात (Police uniform) आलेल्या 18 ते 20 जणांच्या टोळक्याने गोळ्या घालून दोन भावांची (Murder of two brothers) हत्या केली. तिसरा भाऊ गंभीर जखमी (Third brother injured) झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजता हे टोळकं घरात घुसलं आणि त्यांनी तीन भावांवर स्वैर गोळीबार (Firing) केला. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं आता समोर येत आहे.

जमिनीचा वाद

बिहारमधील खगडिया गावातील ही घटना आहे. धनंजय सिंग आणि अक्षय कुमार उर्फ पमपम सिंग यांचे जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होते. याच वादातून पमपम सिंगनं त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह धनंजय सिंग यांच्या घरात घुसून झोपेत असणाऱ्या त्यांना आणि त्यांच्या भावांना जागं केलं. जमिनीवरून बाचाबाची सुरू होताच जमावातील गुंडांनी तिघांवरही अंदाधुंद गोळीबार केला. यात धनंजय सिंग (52 वर्षं), त्यांचा भाऊ विजेंदर सिंग (48 वर्षं) हे दोघं ठार झाले. तर तिसरा भाऊ पप्पू सिंग (40 वर्षं) यांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. जमिनीच्या जुन्या वादातून पमपम सिंगनं हा हल्ला केल्याची माहिती मृत धनंजय सिंग यांचा पुत्र राजीव रंजन यांनी दिल्याचंं 'दैनिक भास्कर'च्या बातमूीत म्हटलं आहे.

हे वाचा -प्रेयसीचा खून केला अन् पत्नीच्या हत्येचंही फुटलं बिंग;साताऱ्यात दुहेरी हत्याकांड

गावात दहशत

या घटनेनंतर गावात कमालीची दहशत असून कुणीही याबाबत साक्ष देण्यासाठी पुढं येत नसल्याचं चित्र आहे. गावातील परिस्थिती पाहून पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी धनंजय सिंग यांच्या कुटुंबाला दिलं आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Murder