रोज होत होता दोघांमध्ये वाद, त्याने घरी जावून चिरला मित्राचाच गळा!

रोज होत होता दोघांमध्ये वाद, त्याने घरी जावून चिरला मित्राचाच गळा!

आरोपी आणि मृतक हे सोबत काम करत असल्याची माहिती असून दोघांचे नेहमीच वाद होत होते.

  • Share this:

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 19 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे जुन्या वादातून मित्राने मित्राची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली. पुलगावच्या हरिराम नगर येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास घटना घडल्याने खळबळ माजली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

बापू उर्फ राजेश गुप्ता(२५) अस मृतकाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास राजेश हा आपल्या अंगणात उभा असतांना आरोपी सागर कांबळे हा तिथे आला. तिथे दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. काही कळायच्या आत सागरने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने  राजेशच्या गळ्यावर, पोटावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राकेश जागेवर कोसळला. अतिरक्त स्त्राव आणि चाकू घाव खोलवर लागल्यामुळे त्याने जागेवरच जीव सोडला.

बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास

दरम्यान, सागर हा राजेशला मारहाण करत असल्याचं परिसरातील नागरिकांना लक्षात येता सोडविण्यासाठी धाव घेतली. मात्र, आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवत तिथून पळ काढला.

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल

आरोपी आणि मृतक हे सोबत काम करत असल्याची माहिती असून दोघांचे नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाला होता. याचाच वचपा काढत आरोपीने आज सकाळी चाकूने वार करत हत्या केली. पुलगाव पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

डोंबिवलीत शिवी दिल्याच्या वादातून मित्राची हत्या

दरम्यान, डोंबिवलीमध्येही  पाच महिन्यांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचा वाद उफाळून आल्यानंतर झालेल्या सशस्त्र हाणामारीत मित्रांनी आपल्या मित्राला जागीच ठार मारण्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये मध्यरात्री घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी 12 तासांच्या आत पाचही आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Published by: sachin Salve
First published: September 19, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या