Home /News /crime /

मतदान करत नाही म्हणत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने दोघांवर केला जीवघेणा हल्ला

मतदान करत नाही म्हणत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने दोघांवर केला जीवघेणा हल्ला

या नगरसेवकावर आधीच अनेक गंभीर गुन्हे असल्याने तो तडीपार देखील होता.

अंबरनाथ, 24 फेब्रुवारी : अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवक सुरेंद्र यादव याने एका मतदारांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान न केल्याच्या रागातून हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांची नावे ही 9 मध्ये आल्याने याबाबत पालिकेचे अधिकाऱ्यांना लक्ष्मण यादव आणि बिरव यादव सांगत होते. मात्र, तुमची नावे तिथेच राहतील तुम्ही मला मतदान करत नाही' असे म्हणत काँग्रेस माजी नगरसेवक सुरेंद्र यादव याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी दोघांवर लाठी काठीने जीवघेणा हल्ला केला. सुरेंद्र यादव याने दोघांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात लक्ष्मण आणि बिरव यादव गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 'पॉर्न व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्हाला अलर्ट, पुन्हा पाहिला तर कारवाई होईल' या नगरसेवकावर आधीच अनेक गंभीर गुन्हे असल्याने तो तडीपार देखील होता. अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत मतदारांवर दबाव टाकण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने केल्याचे जखमींचे म्हणणे आहे.या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कुत्रा चावल्याच्या रागातून तरुणाने कुत्र्याला जीवे मारले डोंबिवलीमध्ये कुत्रा चावल्याच्या रागातून एका तरुणाने कुत्र्याला जीवे मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अजय याला अटक केली आहे. VIDEO: संजय राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर राजकीय वर्तुळातून नाराजी डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड येथील मिनाताई उद्यानाची देखभालीचे काम गेल्या चार वर्षापासून अजय नायडू हे करीत आहेत. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा कुत्राही पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला उद्यानात मोकळे सोडीत असत. 19 फेब्रुवारीला दुपारी 2.30 च्या सुमारास अजय मगरे हा दारू पिऊन गार्डनजवळ आला असता नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाले असल्याचे सांगितले. परंतु, अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारुन उद्यानाच्या आत गेला. त्याच वेळी  शेरुने अजयच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर रागाच्या भरात तरुणाने कुत्राला ठार मारले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या