Home /News /crime /

बांगलादेशी तरुणीने दिला धोका, 3 आठवड्यांनी आढळला फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह

बांगलादेशी तरुणीने दिला धोका, 3 आठवड्यांनी आढळला फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह

नवी मुंबईतील कळंबोली इथं रीना आपल्या दोन मैत्रिणीसोबत राहत होती. तिच्या दोन्ही मैत्रिणी या बांगलादेशी होत्या.

    नवी मुंबई, 17 डिसेंबर :  नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एका बांगलादेशी तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आठवड्यांपूर्वी या तरुणीची हत्या करण्यात आली होती. कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.  या प्रकरणी तिच्या प्रियकराला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 7 डिसेंबर रोजी कळंबोली येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये लिपी सागर शेख उर्फ रीना शेख हिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची हत्या साधारण 21 दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मारेकऱ्याने तिचा गळा दाबून खून केला होता. कृषी कायद्याबद्दल बैठकीवर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले... पोलिसांनी या प्रकरणी तिचा मोबाइल ताब्यात घेतला आणि तपासाची चक्र फिरवली. तिच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीला चौकशीला ताब्यात घेतले असतो तो तिचा प्रियकर असल्याचे समोर आले.  रीना ही बांगलादेशी नागरीक होती. तिचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून हत्या केली, अशी कबुली तिच्या प्रियकराने दिली. कळंबोली इथं रीना आपल्या दोन मैत्रिणीसोबत राहत होती. तिच्या दोन्ही मैत्रिणी या बांगलादेशी होत्या. पण लॉकडाउन लागल्यामुळे दोन्ही मैत्रिणी या बेरोजगार झाल्यामुळे आपल्या देशी परतल्या होत्या. परंतु, रीना ही बांगलादेशमध्ये एकटीच फ्लॅटमध्ये राहत होती. लॉकडाउनमध्ये अटी शिथिल झाल्यामुळे तिच्या मैत्रिणी मुंबईत परत आल्या. त्यांनी रीनाला संपर्क साधला पण तिने काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर दोघीही जणी ब्रोकरकडून दुसरी चावी घेऊन फ्लॅटवर पोहोचल्या. तेव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यानंतर प्लॅट उघडला असता कुजलेल्या अवस्थेत रीनाचा मृतदेह आढळून आला. लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय पोलिसांनी जेव्हा तिच्या मैत्रिणींची चौकशी केली असता त्यांनी रीनाच्या प्रियकराबद्दल माहिती दिली. दोघी जणी बांगलादेशला गेल्यानंतर रीना आणि तिचा प्रियकर भारत दोघेही एकत्र राहत होते. रीनाची हत्या केल्यानंतर तिचा प्रियकर  हा गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर पोलिसांनी भारतला शोधून काढले असता सर्व प्रकार उघड झाला. रीनाचे आणखी एका तरुणासोबत प्रेमसंबंध असून ती मला फसवत होती. मी तिला याबद्दल विचारले असता आमच्यात वाद झाला, त्यामुळे रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केला, अशी कबुली भारतने दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा दाखल करून आरोपी भारतला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या