Home /News /crime /

कचरा कुंडीजवळ भलामोठा दगड आणि तरुणाचा मृतदेह, नागपूर पुन्हा हादरलं

कचरा कुंडीजवळ भलामोठा दगड आणि तरुणाचा मृतदेह, नागपूर पुन्हा हादरलं

शहरातील मनकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे

    नागपूर, 18 जुलै : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये खून आणि हत्याचे सत्र सुरूच आहे. मनकापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. शहरातील  मनकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे.  मनकापूर क्रीडा संकुलच्या मागे असलेल्या कचरा कुंडीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी भलामोठा दगड रक्ताने माखलेला आढळून आला आहे. आधी योग्य मानधन द्या, तरच.., कोरोनाशी लढणाऱ्या पुण्यात खासगी डॉक्टरांची मागणी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. या तरुणाची का आणि कशासाठी हत्या करण्यात आली, पोलीस याबद्दल तपास करत आहे. शहरात दोन दिवसातलीही दुसरी हत्या आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 9 महिन्याच्या मुलीची पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या तर  दोन दिवसांपूर्वीच एका युवकाने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केल्यानंतर स्वत:चा गळा कापून आत्महत्या प्रयत्न केला होती. ही  घटना गुरुवारी  सायंकाळच्या सुमारास नागपूरच्या भांडेप्लॉट चौकातील शंकर शाही मठाजवळ घडली. अख्खं गाव फक्त पाहत होतं, आणि 'ती' पतीचा मृतदेह हातगाडीवर ओढत नेत होती! कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शंका आहे. जखमी युवकावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 32 वर्षीय सोनू इसराईल शेख हा शंकर शाही मठाजवळ राहतो. त्याचे तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. पोलिसांनी बियरची फुटलेली बॉटल जप्त केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक दरम्यान,  नागपूर शहर आणि ग्रामीणच्या कायदा सुव्यवस्था आणि कोविडच्या संदर्भातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे. बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे  यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या