मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Breaking : मुंबई-गोवा महामार्गावरील राणेंच्या फार्म हाऊसजवळील ऑडीत डेड बॉडी, वृत्ताने खळबळ

Breaking : मुंबई-गोवा महामार्गावरील राणेंच्या फार्म हाऊसजवळील ऑडीत डेड बॉडी, वृत्ताने खळबळ

Breaking : मुंबई-गोवा महामार्गावरील राणेंच्या फार्म हाऊसजवळील ऑडीत डेड बॉडी, वृत्ताने खळबळ

Breaking : मुंबई-गोवा महामार्गावरील राणेंच्या फार्म हाऊसजवळील ऑडीत डेड बॉडी, वृत्ताने खळबळ

मुंबई-गोवा हायवेलगत नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रमोद पाटील- मुंबई, 19 नोव्हेंबर: मुंबई-गोवा हायवेलगत नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाडीची कसून तपासणी सुरू आहे. मृत व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला असून मृताच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. हा नक्की काय प्रकार आहे, याचा तपास सुरू आहे.

मुंबई- गोवा हायवेलगत केंद्रिय मंंत्री नारायण राणे यांचं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या बाजूलाच एका लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये (नोंदणी क्रमांक- MH14 GA9585)  हा मृतदेह आढळला आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.  सदर घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस घटनास्थळी  दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान ही कार इथं कशी आली आणि या कारमधील मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजून मिळू शकली नाही. अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder, Narayan rane, Police