आग्रा, 16 जानेवारी : सासू-सुनेचं नातं अनेकदा खूप प्रेमाचं दिसतं, तर कित्येकदा त्यात टोकाचा राग-द्वेषही दिसून येतो. मात्र त्यातून टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना अपवादानं का होईना आजही दिसतातच. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra in Uttar Pradesh) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका वयोवृद्ध महिलेला (old woman) तिच्या सुनेनं (daughter in law) निर्दयपणे मारहाण (beat) केली आहे. अमर उजालानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या व्हीडिओमध्ये एक महिला बाजेवर बसलेल्या म्हाताऱ्या महिलेला झाडूनं मारताना दिसते आहे. हा व्हिडीओ बाह भागातल्या भाऊपुरा गावातील आहे.
या म्हातारीला बेदमपणे मारणारी महिला तिची सून आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल (viral video) झाला आहे. सांगितलं जातं आहे, की ही सून नेहमीच आपल्या सासूला अशी मारहाण करते. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी (police) सुनेवर कारवाई करण्याबाबत पाऊल उचलल्याचंही कळतं आहे. खरंतर पीडित सासूनं कुठलीही तक्रार अजून केली नाही.
(हे वाचा- या बँकांमधील बचत खात्यात मिळतंय सर्वाधिक व्याज, वाचा कुठे मिळेल जास्त फायदा)
बाह भागातील भाऊपुरा गावात सुनेनं आपल्या सासूला क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हीडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात 85 वर्षांची वृद्धा घरातील बाजेवर झोपलेली दिसते. तिच्या पायावर पट्टी बांधलेली दिसते. अचानक तिची सून येते आणि म्हातारीला झाडूनं मारू लागते. वृद्धा आजूबाजूच्यांना वाचवण्याची विनंती करत हाका मारत राहते. ती ओरडतानाही सून काही थांबण्याचं नाव घेत नाही.
(हे वाचा- मोडून पडला संसार पण...! सर्वकाही गमावल्यानंतर 100 रुपयात उभारला व्यवसाय, तिच्या जिद्दीची कहाणी)
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बाह इथले इन्स्पेक्टर विनोद कुमार पवार यांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती मिळताच या गावात पोलिसांना पाठवलं गेलं. सून घरी नव्हती. त्या वृद्धेची अवस्था मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या नाजूक आहे. अनेकदा ही वृद्धा न सांगता घरातून निघून जाते. या कारणानं सुनेनं तिला मारल्याचं कळतं आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh, Viral video.