Home /News /crime /

भाजपच्या गोटात खळबळ, 3 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल

भाजपच्या गोटात खळबळ, 3 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल

या कर्ज प्रकरणाच्या आधारेच आरोपींनी बँकेच्या रक्कमेची चोरी, अफरातफर आणि फसवणूक केलेली आहे.

अहमदनगर, 23 डिसेंबर : अहमदनगर अर्बन बँकेत(Ahmednagar Urban Bank) 3 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बँक घोटाळ्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. बँकेत कोट्यवधीचा अपहार झालेला असून त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणांकडे हे सभासद पाठपुरावा करीत होते. IND vs AUS: ठरलं! रोहित शर्मा 'या' तारखेला होणार टीम इंडियात दाखल यासाठी प्रशासक यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही दालनातून उठणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. त्यानंतर बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देऊन त्यासाठी बँकेचे शाखा अधिकारी मारुती औटी यांना प्राधिकृत केले. त्यानंतर औटी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. बँकचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ कर्जदार मे. टेरासॉफट टेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर लांडगे यांनी कट रचून, संगनमत करुन, खोटी कागदपत्रे तयार करून, बँकेच्या तब्बल 3 कोटी रुपये रक्कमेचा अपहार करून ठेवीदार , सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे. ही रक्कम आर. बी. कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराज एटरप्राइजेस संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करून, त्यांच्या खात्याद्वारे काढून घेतली आहे. आरोपींनी अपहार केलेली रक्कम तब्बल 3 कोटी एवढी आहे. COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव व 13 कोटी कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. या कर्ज प्रकरणाच्या आधारेच आरोपींनी बँकेच्या रक्कमेची चोरी, अफरातफर आणि फसवणूक केलेली आहे. या फिर्यादीवरून माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह घनशाम अच्युत बल्लाळ व आशुतोष सतिष लांडगे तसेच तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये नगर दक्षिण मतदारसंघातून ते तीन वेळा निवडणूक आलेले आज पंधरा वर्षे खासदार म्हणून काम केलेले. असून त्यांनी काही काळ केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली होती. गांधी यांच्यावर बँकेतील रक्कमेची अफरातफर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या