मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रॅपसाँग करून तो म्हणाला, 'इकडे आला तर खाशील मार' पोलीस म्हणाले तुझ्या...

रॅपसाँग करून तो म्हणाला, 'इकडे आला तर खाशील मार' पोलीस म्हणाले तुझ्या...

'तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार' अशा प्रकारचं गाणं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 17 नोव्हेंबर : 'तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार' अशा प्रकारचं गाणं तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक महबूब शेख (रा. काकडे वस्ती, गल्ली नंबर एक, अप्पर इंदिरानगर पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋतिक शेख हा पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांना घेऊन त्याने डॉल्फिन चौकाजवळ अशा प्रकारचं रॅप सॉंग तयार केलं होतं.

(पुण्यात 'मुळशी पॅटर्न' चा थरार, बुधवार पेठेत तरुणांवर कोयत्याने सपासप वार, LIVE VIDEO)

'तू मेला मी घेऊन येईल हार, कारण माझा हूर मला देतोय आधार, तुझी नाही माझ्यासमोर लायकी, मी नी पायात घातली नाईकी, मी पोरगा जरा सनकी.. त्यासोबतच काही अश्लील शब्द या व्हिडिओत त्याने वापरले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली आणि या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(चोरीसाठी काहीही, मॅक्डोनल्डसमधून 72 हजारांचे तेल केले लंपास, पण...)

दरम्यान, अप्परमध्ये रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रकार वाढत आहेत. मुलींना पाहून चाळे केले जात आहेत. या त्रासाला अप्परमधील महिला वैतागल्या आहेत. बिबेवाडी पोलिसात वेळोवेळी तक्रारही दाखल करण्यात आल्यात मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही टवाळकी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होत नाही. त्यामुळे पुणे पोलीस नेमकं करताय काय, असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहे.

First published: