Home /News /crime /

पती-पत्नीमधील वादाने घेतलं गंभीर रुप; 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

पती-पत्नीमधील वादाने घेतलं गंभीर रुप; 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

पती-पत्नीमधील वादाने गंभीर रुप धारण केलं आहे.

वाशिम, 2 एप्रिल : एका महिलेने आपल्या माहेरच्या मंडळीच्या सहकार्याने पतीला मारहाण करून जखमी केल्याची तक्रार शिरपूर पोलिसात करण्यात आली असून नऊ जणांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पतीनेही आम्हाला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आल्याने एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील शिरपूर नजीक असलेल्या शेलगाव बोंदाडे येथील पेशाने शिक्षक असलेल्या निलेश वाझुळकर यांचा 2015 मध्ये केनवड येथील विश्वंभर ज्ञानबा खराटे यांच्या दिपाली नामक मुलीशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी निलेश यांच्या पत्नीने खेड्यात करमत नाही आणि सासू-सासऱ्यांचा सांभाळ करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे 2016 मध्ये निलेश पत्नी दिपालीस केनवड येथे तिच्या माहेरी घेऊन गेला. हे प्रकरण पुढे न्यायालयात नेण्यात आलं. त्यानंतर एके दिवशी रिसोड येथे जाऊन सासरच्या मंडळींनी निलेश वाझुळकर यास मारहाण केली. आज शुक्रवार 02 एप्रिल रोजी सकाळी निलेशच्या सासरकडील मंडळी चार चाकी व काही दुचाकी घेऊन पत्नी दीपाली, तिचे वडील विश्वंभर खराटे, आणि काही नातेवाईकांसोबत (ऋषिकेश खराटे, ज्ञानबा खराटे, गजानन खराटे, सु.भा.इंगळे व इतर तीन जण) शेलगाव बोंदाडे येथे आले आणि निलेश वाझुळकर याच्या घरासमोर त्याला ऋषिकेश खराटेने काठीने मारहाण केली. तर गजानन खराटे हा मारण्यासाठी कुऱ्हाड घेऊन धावला. यावेळी निलेशचा आई-वडीलांना सुद्धा पत्नीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. निलेश वाझुळकर यांच्या फिर्यादीवरून दिपाली वाझुळकर, विश्वंभर खराटे, ऋषिकेश खराटे, गजानन खराटे, ज्ञानबा खराटे, सु.भा.इंगळे व इतर तीघे असा नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विनोद चव्हाण हे करीत आहेत. हे ही वाचा- छेडछाडीच्या तक्रारीसाठी गेलेल्या वडिलांना पोलिसांनी हकललं, पुढे आक्रीतच घडलं तर दुसऱ्या गटाकडुन दिपाली वाझुळकर हिने आपण पती व सासरच्या मंडळी विरुद्ध 498 ची केस केली असून तिचा निपटारा करण्यासाठी सासरच्या मंडळीने शेलगाव येथे बोलवल्याचं तिनं सांगितलं. याबाबत तिने सांगितलं की, आम्ही 02 एप्रिल रोजी सकाळी शेलगाव इथं पोहोचलो. त्यावेळी सासरच्यांनी लोखंडी रॉड व काठीने आम्हाला मारहाण केली. तसेच निलेश वाझुळकर यांच्या कुटुंबीयांनी व गावातील काही लोकांनी निलेशच्या सासरच्या मंडळीकडून आणलेली एम एच 37 जी 8161 या चार चाकी गाडीची तोडफोड केली आहे. दिपाली वाझुळकर यांच्या फिर्यादीवरून निलेश वाझुळकर, प्रकाश वाझुळकर, सह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, WASHIM NEWS

पुढील बातम्या