मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /20 रुपयांच्या सिगरेटसाठी हत्या, BSF जवान आणि त्याच्या वडिलांवर गोळीबार

20 रुपयांच्या सिगरेटसाठी हत्या, BSF जवान आणि त्याच्या वडिलांवर गोळीबार

एका सिगरेटच्या (Cigarette) किंमतीवरून कँटिनचालक (Canteen Owner) आणि गुंडांमध्ये (criminals) वाद होऊन त्याचं परिणती तुंबळ हाणामारी (fighting)आणि त्यानंतर गोळीबारात (firing) झाली.

एका सिगरेटच्या (Cigarette) किंमतीवरून कँटिनचालक (Canteen Owner) आणि गुंडांमध्ये (criminals) वाद होऊन त्याचं परिणती तुंबळ हाणामारी (fighting)आणि त्यानंतर गोळीबारात (firing) झाली.

एका सिगरेटच्या (Cigarette) किंमतीवरून कँटिनचालक (Canteen Owner) आणि गुंडांमध्ये (criminals) वाद होऊन त्याचं परिणती तुंबळ हाणामारी (fighting)आणि त्यानंतर गोळीबारात (firing) झाली.

लखनऊ, 29 जुलै : एका सिगरेटच्या (Cigarette) किंमतीवरून कँटिनचालक (Canteen Owner) आणि गुंडांमध्ये (criminals) वाद होऊन त्याचं परिणती तुंबळ हाणामारी (fighting)आणि त्यानंतर गोळीबारात (firing) झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात गुंडांनी कँटिन चालकाची गोळ्या घालून हत्या (murder) केली, तर आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीएसएफ जवानालादेखील गोळ्या घातल्या. हा जवान सध्या गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अशी झाली हत्या

उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरपाशी राष्ट्रीय महामार्ग 91 वर निसार अहमद यांचं एक छोटेखानी हॉटेल आहे. हायवेनं ये-जा करणारे प्रवासी खाण्यापिण्यासाठी या ठिकाणी थांबत असतात. असेच चार गुंड या हॉटेलवर जेवण्यासाठी थांबले होते. या दरम्यान त्यांनी अहमद यांच्याकडं सिगरेटची मागणी केली. त्याच्या किंमतीवरून त्यांचा अहमद यांच्याशी वाद झाला. त्यानंतर या चौघांनी निसार अहमद यांना मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहून निसार अहमद यांचा बीएसएफमध्ये असणारा मुलगा त्यांच्या मदतीसाठी आला. सध्या सुट्टी असल्यामुळे तो घरी आला होता. या गुंडांनी दोघांनाही जबर मारहाण केली आणि दोघांवरही गोळीबार केला. यात निसार अहमद यांचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

त्या करून आरोपी फरार

हत्या केल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी हे आरोपी तिथून पसार झाले. वाटेत त्यांनी स्वतःच्या लाल रंगाच्या अल्टो कारचा मुद्दाम अपघात घडवून आणला आणि कारचे अक्षरशः दोन तुकडे केले. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाच्या अल्टो कार असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यापैकी कुणीही दोषी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. अखेर या महामार्गावरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळलं आणि त्यानंतर या आरोपींचा शोध पोलिसांना लागला.

हे वाचा -Love Marriage च्या 4 महिन्यांनी तरुणाची आत्महत्या; बहिणीचा नेट सुरू असता तर...

हे चारही आरोपी नोएडा परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांना त्यांना अटक करून पुढील कारवाई सुरु केली आहे.

First published:
top videos

    Tags: Murder, Uttar pardesh