मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'माझ्या मुलांकडे सापाचा DNA होता, ती राक्षस झाली असती', विकृत बापाची अंगावर शहारे आणणारी घटना

'माझ्या मुलांकडे सापाचा DNA होता, ती राक्षस झाली असती', विकृत बापाची अंगावर शहारे आणणारी घटना

मॅथ्यू टेलर कोलमन असं नराधम बापाचं नाव आहे. आपल्या मुलांचा डीएनए (DNA) सापांसारखा (Serpent) असून, ती भविष्यात राक्षस होतील, या भीतीनं त्याने आपल्या दोन मुलांची बंदुकीने हत्या केली.

मॅथ्यू टेलर कोलमन असं नराधम बापाचं नाव आहे. आपल्या मुलांचा डीएनए (DNA) सापांसारखा (Serpent) असून, ती भविष्यात राक्षस होतील, या भीतीनं त्याने आपल्या दोन मुलांची बंदुकीने हत्या केली.

मॅथ्यू टेलर कोलमन असं नराधम बापाचं नाव आहे. आपल्या मुलांचा डीएनए (DNA) सापांसारखा (Serpent) असून, ती भविष्यात राक्षस होतील, या भीतीनं त्याने आपल्या दोन मुलांची बंदुकीने हत्या केली.

  मुंबई 14 ऑगस्ट : जगात माथेफिरू लोकांची कमतरता नाही. मानसिक विकृती असणारे लोक कधी काय करतील याचा नेम नसतो. अशाच एका विकृत व्यक्तीच्या भयंकर कृत्यानं सगळं जग हादरलं आहे. अमेरिकेत (USA) ही घटना घडली असू, एका बापानंच (Father) वेडगळ समजुतीपोटी आपल्या दोन चिमुकल्या मुलांची निर्घृण हत्या (Killed Two Sons) केली. वन इंडिया डॉट कॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  मॅथ्यू टेलर कोलमन असं नराधम बापाचं नाव आहे. आपल्या मुलांचा डीएनए (DNA) सापांसारखा (Serpent) असून, ती भविष्यात राक्षस होतील, या भीतीनं त्याने आपल्या दोन मुलांची बंदुकीने हत्या केली. यापैकी एक मूल 2 वर्षांचं, तर एक मूल केवळ 10 महिन्यांचं होतं. कॅलिफोर्नियातल्या एका सर्फिंग शाळेचा मालक असणारा कोलमन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मेक्सिकोला गेला होता आणि तिथे त्याने आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली.

  पालिका कर्मचाऱ्याने आपल्याच हाताने गळ्यावर फिरवला सुरा; यापूर्वीही केला होता प्रयत्न

  क्यूएएनओन (QAnon) आणि जगाच्या विरोधात घडणाऱ्या षड्यंत्रांबाबत तो अतिशय दक्ष असून जगाचं कोणी नुकसान करू नये असं त्याला वाटतं; पण त्याची मुलं राक्षस होण्याची भीती असल्यानं जग वाचवण्यासाठी हे कृत्य केलं, असं त्याने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं. आपण चुकीचं कृत्य करतोय याची त्याला जाणीव होती; पण जग वाचवण्याचा हा एकच मार्ग आपल्याकडे होता, असं त्याला वाटत होतं, असं सांगून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

  ‘क्यूएएनओन आणि इल्युमिनाटी षड्यंत्र सिद्धांतांची मला चांगली माहिती होती. त्याबाबत मिळणाऱ्या संकेतांतून माझ्या पत्नीचा डीएनए सापाचा असून, मुलांचा डीएनएदेखील सापाचा आहे, हे कळलं होतं. ही मुलं मोठी झाल्यावर राक्षस झाली असती,’ असंही कोलमन यानं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं.

  वडील खात होते चणे, मुलानेही केला हट्ट; खाताच 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू!

  क्यूएएनओन (QAnon) हा अशा लोकांचा समूह आहे, जो षड्यंत्र सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. या लोकांच्या मते जग दिसतं तसं नाही. जग संकटात असून त्याला वाचवलं पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे लोक हे जग चालवत आहेत, यामध्ये राष्ट्राध्यक्षही सामील आहेत अशी या समूहाची धारणा आहे.

  आपला पती मुलांना गाडीत घालून कुठे तरी घेऊन गेला आहे, असं कोलमनच्या पत्नीने 7 ऑगस्ट रोजी सांता बार्बरा इथल्या पोलिसांना सांगितलं. तो त्यांना एका शिबिरात घेऊन चालल्याचं त्यानं सांगितलं होतं; पण कुठे ते त्यानं सांगितलं नाही, असंही त्याच्या पत्नीने सांगितलं. घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने तिचे कॉल किंवा मेसेजेसना उत्तर देणं थांबवलं होतं. 'पतीकडून मुलांना धोका आहे, हे मला माहीत नव्हतं. कोलमनशी कसलंही भांडण किंवा वाद नव्हता. त्यामुळे तो मुलांना ठार मारील अशी अजिबात शंका आली नव्हती,' असं तिने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. कोलमनच्या पत्नीनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर कोलमनचा फोन ट्रॅक करण्यात आला आणि तो मेक्सिकोमध्ये असल्याचं आढळून आलं. त्याचा शोध सुरू असताना तो मेक्सिकोहून अमेरिकेला परत जात असताना सीमेवर सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. एफबीआयने कोलमनवर अमेरिकी नागरिकांना परदेशात नेऊन ठार केल्याचा आरोप ठेवला आहे.

  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये यू-ट्यूबने (You Tube) क्यूएएनओन सिद्धांतांवर विश्वास ठेवणाऱ्या ट्रम्प यांच्या समर्थकांचा व्हिडिओ हटवत असल्याचं जाहीर केल्याने या समूहाबद्दल जगभरात चर्चा सुरू झाली होती. फेसबुकनेही (Facebook) ऑगस्टमध्ये यावर बंदी आणली होती. 2017मध्ये एका अज्ञात युझरनं याबाबत काही पोस्ट टाकायला सुरुवात केली होती. अनेक प्रकारची गोपनीय माहिती हाती लागल्याचं त्याने म्हटलं होतं. एफबीआयने (FBI) क्यूएएनओन हा देशातल्या कट्टरवादी लोकांना हिंसक कारवाया करण्यास चिथावणी देणारा घटक असल्याचं म्हटलं होतं. हे सिद्धांत लोकांपर्यंत पोहोचवणारी एकच व्यक्ती आहे की यामागे अनेक जण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  First published:

  Tags: Crime news