जबलपूर, 7 सप्टेंबर : प्रेयसीच्या (Girlfriend) ब्लॅकमेलिंगला (blackmailing) कंटाळून प्रियकराने (Boyfriend) प्रेयसीची निर्घृण हत्या (Murder) केल्याची बाब समोर आली आहे. आपली गर्लफ्रेंड ही इतर तरुणांसोबतही संबंध ठेवत असल्याचा संशय प्रियकराला होता. त्याचप्रमाणं तिच्याकडून सातत्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीलाही कंटाळला होता. एक दिवस संधी साधूनत त्याने तिचा काटा काढला.
अशी झाली ओळख
मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये राहणाऱ्या शालिनी जैन नावाच्या 24 वर्षांच्या तरुणीचे तिच्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या महेंद्र उर्फ पप्पू गढवालसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याचवेळी शालिनीचे तिच्या वयाच्या इतर मित्रांशीदेखील संबंध असून आपल्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींशीही शालिनीचे संबंध असल्याचा संशय महेंद्रला होता. शालिनीला दारू पिण्याची आवड होती. त्यामुळे ती शैलेंद्रकडे वारंवार दारूची मागणी करायची आणि शैलेंद्र तिची मागणी पूर्ण करत असे.
ब्लॅकमेलिंग आणि धोका
शालिनी ही महेंद्रकडून प्रत्येक भेटीत काही पैसे मागून घेत असे आणि आपल्या आईला नेऊन देत असे. गेल्या आठवड्यात महेंद्र नेहमीप्रमाणे दारूची बाटली घेऊन तिला भेटायला गेला. दारू प्यायल्यानंतर नशेत असताना शालिनीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने तिला पैसे दिले. मग ती ते पैसे आईला देऊन परत आली. रात्री एकत्र जेवण करायचं ठरल्यानंतर महेशने दोघांसाठी स्वयंपाक केला.
दारूच्या नशेत केला खून
दारूच्या नशेत असणारी शालिनी संध्याकाळीच झोपी गेली. त्यानंतर रात्री 10 च्या सुमाराला ती झोपेतून जागी झाली आणि उरलेली दारू पिऊन पुन्हा झोपी गेली. खून करण्याच्या इराद्याने आलेल्या महेंद्रने ‘प्यार मे धोका’ असं लिहिलेला कागद अगोदरच खिशात ठेवला होता. ठरल्याप्रमाणे त्याने शालिनीच्या अंगणातील दगड आणून तिच्यावर तिचे डोके आपटायला सुरुवात केली. काही वेळातच ती बेशुद्ध झाली. तिचा जीव जाईपर्यंत त्याने तिचे डोके दगडावर आपटले. त्यानंतर ‘प्यार मे धोका’ असं लिहिलेला कागद तिच्या रक्तबंबाळ कपाळावर लावला. त्याचा राग इतका होता की मृतदेहाच्या गुप्तांगात त्याने मिरच्याही कोंबल्या.
हे वाचा -समाधी घ्यायला महिला उतरली गंगेत, भक्तांनी सुरु केलं भजन, पोलिसांची धावपळ
या घटनेनंतर खोलीत रक्ताचा सडा पडला होता. मात्र त्याच ठिकाणी बसून त्याने आरामात जेवण केलं आणि पहाटेच्या सुमाराला आपलं पेपर वाटण्याचं काम करण्यासाठी निघून गेला. काही दिवसांनी शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांना हा हत्येचा सुगावा लागला. मुलीच्या आईने व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे. त्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.