मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

त्याला करायचं होतं लिंग परिवर्तन, घरच्यांनी फटकावल्यामुळे केली सर्वांची हत्या

त्याला करायचं होतं लिंग परिवर्तन, घरच्यांनी फटकावल्यामुळे केली सर्वांची हत्या

 एकुलत्या एका मुलानं (Boy) घरातील सर्वांची हत्या (Murder of family members) करण्यामागचं कारण (Reason) पोलिसांनी शोधून (Police found out) काढलं आहे.

एकुलत्या एका मुलानं (Boy) घरातील सर्वांची हत्या (Murder of family members) करण्यामागचं कारण (Reason) पोलिसांनी शोधून (Police found out) काढलं आहे.

एकुलत्या एका मुलानं (Boy) घरातील सर्वांची हत्या (Murder of family members) करण्यामागचं कारण (Reason) पोलिसांनी शोधून (Police found out) काढलं आहे.

  • Published by:  desk news

रोहतक, 3 सप्टेंबर : एकुलत्या एका मुलानं (Boy) घरातील सर्वांची हत्या (Murder of family members) करण्यामागचं कारण (Reason) पोलिसांनी शोधून (Police found out) काढलं आहे. 20 वर्षांच्या या तरुणाला लिंग परिवर्तन (gender change) करण्याची इच्छा होती. त्यासाठी तो गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होता. मात्र ही बाब घरच्यांना समजल्यावर त्याला घरच्यांनी फटकावून काढला होता. याचा राग मनात धरून या तरुणाने आपले आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या केली होती.

लिंग परिवर्तनासाठी हवे होते 5 लाख

हरियाणाच्या रोहतकमध्ये राहणाऱ्या अभिषेक नावाच्या कॉलेज विद्यार्थ्याने घरातील सर्वांची गोळ्या घालून हत्या केली होती. अभिषेकला लिंग परिवर्तनाचं ऑपरेशन करण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज होती. त्याने घरच्यांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र घरच्यांनी त्याला एवढे पैसे द्यायला नकार दिला. लिंगपरिवर्तन करून एका मित्रासोबत देश सोडण्याचा त्याचा प्लॅन होता. याबाबत जेव्हा घरच्यांना माहिती मिळाली, तेव्हा सर्वांनी मिळून त्याला धोपटून काढले. त्यानंतर अभिषेकनं घरातील सर्वजण झोपेत असताना गोळ्या झाडून सर्वांची हत्या केली.

सुरुवातीला वाटले संपत्तीचे कारण

वडिलांनी राहते घर बहिणीच्या नावे केल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचं सुरुवातीला समोर येत होतं. मात्र त्यात काहीही तथ्य असून त्याच्या लैंगिक जीवनाला होणाऱ्या विरोधामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात सिद्ध झालं आहे.

हे वाचा -धावत्या रिक्षात निघाला साप अन्..; दिवसभर काबाडकष्ट केलेल्या मजूराचा दुर्दैवी अंत

अशी केली हत्या

अभिषेकनं घरातील सर्वजण झोपेत असताना बंदुकीनं सर्वांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. यात त्याचे वडील प्रदीप मलिक, आई बबली मलिक, बहिण तमन्ना मलिक आणि आजी रोशनी या सर्वांच्या डोक्यात गोळ्या मारल्या. वडील, आई आणि आजीचा घरातच मृत्यू झाला, तर बहीण तमन्नावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी अभिषेकला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Murder Mystery