हरियाणा, 26 मार्च : निकिता तोमर हत्याकांडात (Nikita Tomar Judgment) फरीदाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने दोषी तौफीक आणि रेहान यांच्या शिक्षेवर निर्णय दिला आहे. कोर्टाने रेगान आणि तौफीक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शुक्रवारी शिक्षेबाबत चर्चा सुरू असताना निकिता तोमरच्या वकिलांनी कोर्टाकडे आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी, यापुढे समाजात एक उदाहऱण स्थापित होईल. दोषींच्या वकिलांनी मात्र बचाव करण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा विरोध केला आणि ही घटना रेयर ऑफ द रेयरेस्टच्या श्रेणीत येत नसल्याचं सांगितलं. दोन्ही दोषी विद्यार्थी असल्याने कोर्टाने शिक्षा देताना याचाही विचार करावा, असं दोषीच्या वकिलांकडून सांगण्यात आलं.
26 ऑक्टोबर 2020 रोजी हरियाणातील वल्लभगडमध्ये निकिता तोमर हिला भररस्त्यात गोळी मारण्यात आली होती. यात तिचा मृत्यू झाला होता. फास्ट ट्रॅक कोर्टाने तौफीक आणि रेहान नावाच्या दोन तरुणांना बुधवारी निकिताच्या हत्येमागे जबाबदार असल्याचं मानलं. तर तिसरा आरोपी अजरुद्दीनला कोर्टाने सोडून दिलं होतं. यादरम्यान गुरुवारी सायंकाळी या प्रकरणात निर्णय देणाऱ्या न्यायाधिशांची बदली करण्यात आली. हरियाणा सरकारने अतिरिक्त जिल्हा आणि सेशन कोर्टाचे न्यायाधीश सरताज बसवाना यांची बदली रेवाडी येथे केली.
हे ही वाचा-शीर घेऊन लोकल अंबरनाथ यार्डात तर धड सापडले उल्हासनगर स्टेशनजवळ, थरारक घटना
बुधवारी कोर्टाने 12 मिनिटांत केली सुनावणी
निकिता तोमरच्या हत्या प्रकरणात अवघ्या 12 मिनिटात कोर्टाने आपल्या निर्णय दिला. फास्ट ट्रॅक कोर्टाने तौफीक आणि रेहान या दोघांना निकिताच्या हत्येचे दोषी ठरवलं. अजरुद्दीनला मात्र या प्रकरणात बरी करण्यात आली. अजरुद्दीनवर निकिताच्या मारेकऱ्यांना बदुंक पुरविण्याचा आरोप होता.
वल्लभगडमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी निकिता तोमर परीक्षा देऊन कॉलेजमधून बाहेर निघाली होती, तेव्हा तिघेजण तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करीत होते. निकिताने विरोध केल्यानंतर त्यापैकी एकाने गोळी मारून तिची हत्या केली. हा सर्व प्रकार कॉलेजच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याच्या आधारावर पोलिसांनी दोषींचा शोध घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Haryana