Home /News /crime /

बांग्लादेशी नागरिकाने केला महिलेचा खून, तपासात पोलिसांना समजली धक्कादायक माहिती

बांग्लादेशी नागरिकाने केला महिलेचा खून, तपासात पोलिसांना समजली धक्कादायक माहिती

मूळचा बांग्लादेशी (Bangladesh) असणाऱ्या नागरिकाने एका महिलेचा (woman) खून (murder) केल्याची घटना उघड झाली आहे.

    नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : मूळचा बांग्लादेशी (Bangladesh) असणाऱ्या नागरिकाने एका महिलेचा (woman) खून (murder) केल्याची घटना उघड झाली आहे. या महिलेसोबत बांग्लादेशी नागरिकाचे लैंगिक संबंध (Physical relations) होते. मात्र या महिलेने इतर पुरुषांशी सलगी करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात बांग्लादेशी नागरिकाने तिचा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. महिलेसोबत होते संबंध मूळचा बांग्लादेशी नागरिक असणारा बाबुल मियां दिल्लीजवळील नोएडा परिसरात राहात होता. त्याचे फातिमा बिबी नावाच्या महिलेसोबत लैंगिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एकमेकांशी संबंध होते आणि सलोख्याचं नातं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी फातिमाचे इतर पुरुषांशी संबंध असल्याचं बाबुलला समजलं. त्यावरून दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. एक दिवस झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर बाबुलनं फातिमाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर बाबुल फरार होता. तपासात उघड झाले सत्य पोलिसांनी फातिमाच्या हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. बाबुल मिया हा मूळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड, बनावट निवासी प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केलं आहे. एवढंच नव्हे, तर त्याच्याकडे बनावट पासपोर्टदेखील आढळून आला आहे. हे वाचा - अमानूष! घटस्फोट मिळण्यासाठी क्रूरतेचा कळस, गर्भवती पत्नीला टोचलं HIVचं इंजेक्शन घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर बाबुलनं केलेल्या हत्येचा उलगडा तर झालाच, मात्र त्याचबरोबर बांग्लादेशी नागरिक कशा प्रकारे भारतात घुसखोरी करत आहेत, याचं धक्कादायक वास्तवदेखील या तपासातून पुढं आलं आहे. केवळ घुसखोरीच नव्हे, तर देशाच्या राजधानीत हे घुसखोर बिनधास्त राहत असल्याचंही दिसून आलं आहे. त्यांच्याकडे पासपोर्ट, आधार कार्ड यासारखी महत्त्वाची ओळखपत्र बनावट स्वरूपात असल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही ओळखपत्र बनावट असल्याचं लक्षात आलं. मात्र तोपर्यंत अनेक सेवा सुविधांसाठी या ओळखपत्रांचा गैरवापर झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Delhi, Murder

    पुढील बातम्या