लखनऊ, 8 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळण्यात आलं असून ती यामध्ये 75 टक्के भाजली आहे. सध्या या मुलीला बीएचयूमध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलीला जाळण्याचं कारण ऐकलं तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. छेडछाडीबाबत कुटुंबाकडे तक्रार केली म्हणून आरोपी तरुणाने मुलीला भररस्त्यात जिवंत जाळलं.
पीडितेच्या कुटुंबीयांनी घराशेजारी राहणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसपी देवेंद्र नाथ यांनी सांगितले की, पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम 307, 326, 354D आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा-पती आणि मुलासह सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला; 1000 फूट दरीत सापडला मृतदेह
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुबहडमध्ये शुक्रवारी रात्री मुलीच्या किंचारण्याचा आवाज ऐकून तिचे कुटुंबीय गच्चीवर गेले. यावेळी 9 वीतील ती मुलगी आगीच्या विळख्यात दिसली. यानंतर तातडीने तिच्या वडिलांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचे हात भाजले. तातडीने मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथून तिला बीएचयूमध्ये हलविण्यात आलं. मुलगी यामध्ये 75 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणात शेजारी तरुणांवर आरोप केला आहे. शेजारी राहणारा कृष्णा गुप्ता हा नेहमी मुलीची छेड काढत असे. याची तक्रार त्याच्या घरच्यांना केल्यामुळे रागाच्या भरात सूड उगविण्यासाठी त्याने मुलीला जिवंत जाळलं.