मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /परप्रांतीय मजुराने 90 वर्षीय वृद्ध महिला आणि गायीवर केले अत्याचार, दापोलीतील घटना

परप्रांतीय मजुराने 90 वर्षीय वृद्ध महिला आणि गायीवर केले अत्याचार, दापोलीतील घटना

एका परप्रांतीय कामगाराने 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका गायीवर सुद्धा अत्याचार केला.

एका परप्रांतीय कामगाराने 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका गायीवर सुद्धा अत्याचार केला.

एका परप्रांतीय कामगाराने 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका गायीवर सुद्धा अत्याचार केला.

दापोली, 09 जानेवारी : रत्नागिरी (Ratanagri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यात विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे.  एका परप्रांतीय कामगाराने 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका गायीवर सुद्धा अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका गावात खाणीमध्ये सोहन भिल नावाच्या नराधमाने चक्क 90 वर्षीय  वयोवृद्ध महिलेवर अत्याचार  केला असून तो एवढ्यावरच थांबला नाही  तर त्याने चक्क गो मातेवर अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, याबाबत दापोली पोलीस स्थानकात तब्बल पंधरा दिवसानंतर त्या वयोवृद्ध महिलेच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून पोलीस त्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

50 वर्षीय विधवेवर GangRape; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला स्टीलचा ग्लास

वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाने पंधरा दिवसानंतर गो मातेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दापोली तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटरवर असणाऱ्या एका गावात सोहन भील याने आधी वयोवृद्ध महिलेवर व  नंतर काही दिवसांनी एका गायीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

पहाटे गुरांच्या गोठ्यात कोणीही नसल्याचा अंदाज घेऊन त्याने गो मातेचे पाय बांधून अत्याचार केला होता. ही बाब लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी त्याला रंगेहात पकडून चांगला चोप दिला होता. परंतु, या नराधमावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पंचक्रोशीतून संताप व्यक्त केला जात आहे.

चुकूनही Google वर Search करू नका 'या' 10 गोष्टी; होऊ शकतं नुकसान

या नराधमाने गेली काही वर्ष एका खाणीमध्ये काम केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावामध्ये बैठक सुद्धा घेतली होती. अशा दुष्कृत्य करणाऱ्याला पाठीशी घालायचे नाही, असा ठराव गावकऱ्यांनी मांडला होता. पण अचानक त्याला सोडून देण्यात आले असून त्याच्याकडून ही निंदनीय घटना घडल्यामुळे पंचक्रोशीतील लोकं चांगलेच संतप्त झाले आहेत.

या नराधमामुळे पंचक्रोशीतील महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून त्याचा वेळीच बंदोबस्त करावा व त्याला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून  होत आहे.

First published: