मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नंदुरबार हादरलं, चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

नंदुरबार हादरलं, चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

 दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने...

दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने...

दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने...

  • Published by:  sachin Salve

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 19 मे : नंदुरबारमध्ये (Nandurbar) एका 40 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरकृत्य (Rape) केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Nandurbar police) या नराधमाला ताब्यात घेतले आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. अनिल आत्माराम गुरुबक्षाणी असं या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याचे किराणाचे दुकान आहे.

या परिसरात राहणारी 5 वर्षीय चिमुरडी आरोपीच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आली होती.आरोपीच्या दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने तिच्या सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलगी घाबरून तिथून पळत घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत कुटुंबातील सदस्यांना सांगितली. आपल्या चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांना एकच हादरा बसला.

300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि

त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना उपनगर पोलीस स्टेशन गाठले. आणि नराधम अनिल गुरुबक्षाणी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी  आरोपीच्याविरोधात आयपीसी 370  व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधीत पीडितेची वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली असून आरोपीला देखील रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा अधिकचा तपास करत आहे.

बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या नराधम बापाचा मुलीनं केला खून

दरम्यान, राजस्थानच्या जोधपूरमध्ये (jodhpur rajasthan) मुलीनेच स्वत:च्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.  मद्यधुंद स्थितीत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीनं केला आहे. नात्याला काळिमा फासणारा नराधम वडील नेहमीच आपल्या मुलीला मद्यपान करून त्रास देत असे. सोमवारी रात्री तर त्यानं सर्व मर्यादा ओलांडत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला.

‘द फॅमिली मॅन 2’च्या ट्रेलरमधील 'या' अभिनेत्याने 6 महिन्यांपूर्वी केली आत्महत्या

त्यामुळे मुलीनं आपला बचाव करत असताना, हातात सापडलेल्या काठीनं थेट डोक्यावर वार केल्यानं तो निपचित जमिनीवर पडला आणि रक्तस्त्राव होऊ लागला. याप्रकारानं घाबरलेली मुलगी आपल्या आईजवळ परत जावून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर पाहिले असता वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.  याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं आहे.

First published:

Tags: Rape, नंदुरबार