मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्यार का पंचनामा! 42 वर्षीय व्यक्ती विशीतील तरुणीच्या पडला प्रेमात, गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

प्यार का पंचनामा! 42 वर्षीय व्यक्ती विशीतील तरुणीच्या पडला प्रेमात, गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

गावासमोर दोघांची भयावह अवस्था केली.

गावासमोर दोघांची भयावह अवस्था केली.

गावासमोर दोघांची भयावह अवस्था केली.

  • Published by:  Meenal Gangurde

बिहार, 10 ऑक्टोबर : बिहारमधील (Bihar News) पूर्णिया येथे एका मिस्त्रीला एका आदिवासी तरुणीसोबत लोकांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. चिडलेल्या लोकांनी पहिल्यांदा तर दोघांचं टक्कल करून गावाभर फिरवलं. त्यानंतर दोघांचं लग्न लावून दिलं. ही घटना कृत्यानंदनगर गणेशपुर पंचायत आदिवासी गावात शनिवारी घडली. परोरा गावात राहणारा सुरेंद्र राय (42) याचा काही वर्षांपासून 20 वर्षांच्या एका तरुणीसोबत प्रेमप्रसंग सुरू होता.

मात्र तो आधीच विवाहित होता. आदिवासी समाजातील (Adivasi People) लोकांनी शुक्रवारी सायंकाळी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. यानंतर लोकांनी दोघांना मारहाण केली. यानंतर समाजातील लोकांनी दोघांचं टक्कल करीत चपलांची माळा घालून गावभर फिरवलं. आदिवासी समाजातील लोकांनी सांगितलं की, अशा प्रकारचं कृत्य पुन्हा घडू नये यासाठी दोघांना ही शिक्षा देण्यात आली आहे. (A 42 year old man fell in love with a 20 year old girl see what villagers did)

घटनेनंतर स्थानिकांनी आदिवासी पद्धतीने दोघांचं लग्न लावून दिलं. आणि शेवटी लोकांनी तरुणीला रिक्षात बसवून तरुणासोबत पाठवणी केली. या लग्नाची सर्व परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.

हे ही वाचा-पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर

गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, सुरेंद्र राय याला यापूर्वी दोन वेळा तरुणीसोबत पकडण्यात आलं होतं. यानंतर त्याची समजूत घालून सोडण्यात आलं. मात्र तिसऱ्या वेळेत जेव्हा लोकांनी त्याला रंगेहात पकडलं तेव्हा आदिवासी समाज आणि पंचायतच्या सरपंच आदी सर्वांना बोलावून त्यांचं लग्न लावून दिलं.

First published:

Tags: Bihar, Boyfriend, Crime news, Girlfriend