'ते माझ्यावर अश्लील कमेंट्स करतात, पत्र लिहून BHEL कंपनीच्या अकाऊंटंटची आत्महत्या

'ते माझ्यावर अश्लील कमेंट्स करतात, पत्र लिहून BHEL कंपनीच्या अकाऊंटंटची आत्महत्या

नेहा यांना आत्महत्या करण्यास कंपनीतील अधिकाऱ्यांनी प्रवृत्त केल्याचा पतीचा आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल तपास सुरू.

  • Share this:

हैदराबाद, 18 ऑक्टोबर: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड (BHEL)या कंपनीतील एका महिला अकाऊंटटने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसाईड नोट लिहून या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं कंपनीमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर महिलेच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचललं असल्याचं सुसाईडनोटमध्ये म्हटलं आहे. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकाऱ्यांनी मदत केली असून मानसिक छळ करत असल्याचा आरोपही कंपनीतील अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.

पतीच्या म्हणण्यानुसार अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या पत्नीवर आत्महत्या करण्यासाठी दबाव आणला होता. घटनेनंतर पतीच्या जबाबानुसार पोलिसांनी उप-महाप्रबंधक आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी आणि तपास सुरू आहे.

महिलेसोबत नेमकं काय घडलं?

नेहा चौकसे ह्या भोपाळमध्ये राहात होत्या. त्यांना हैदराबाद इथे BHEL कंपनीमध्ये डिप्युटी ऑफिसर अकाऊंटटमध्ये कार्यरत होत्या. पोलीस अधिकारी व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साधारण 10.30च्या सुमारास त्यांनी स्वत:ला त्यांच्या खोलीत कोंडून घेतलं होतं. बऱ्याच वेळापासून आपली पत्नी बाहेर न आल्यामुळे पतीने दार वाजवण्यास सुरुवात केली मात्र आतून कोणताही आवाज न आल्यानं मनात शंकेची पाल चूकचूकली आणि अखेर तेच घडलं. त्यांनी दरवाजा तोडला आणि पाहतात तर त्यांच्या पत्नीनं म्हणजे नेहा यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. नेहाजवळ सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये BHEL कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी छळ करतात आणि आत्महत्येसाठी त्यांनीच प्रवृत्त केल्याचं या सुसाईडनोटमध्ये नेहानं म्हटलं होतं.

नेहा यांचा फोन हॅक केला जात होता.

माझा फोन हॅक केला जात आहे. माझे सगळे फोन ट्रॅप केले जात असल्याचंही नेहा यांनी सुसाईडनोटमध्ये म्हटलं आहे. वरिष्ठ अधिकारी नेहा यांची गुप्त माहिती मिळवत होते. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अश्लील शब्द वापरल्याचंही नेहा यांनी सुसाईडनोटमध्ये लिहिलं आहे.

भोपाळमधून नेहाने केली होती ट्रान्सफर

लग्नानंतर नेहाने नवऱ्यासोबत राहण्यासाठी भोपाळहून हैदराबाद इथे आपली ट्रान्सफर करून घेतली होती. हैदराबाद BHEL कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आर्थर किशोर कुमार यांनी दोन महिन्यांपासून नेहा यांना त्रास देत होते. त्यांच्यासोबत मोहनलाल सोनी, तीरथभासी स्वेन, सीताराम पेंटाकोटा और महेश कुमार नावाच्या सहकाऱ्यांनी नेहा यांच्यावर अश्लील शब्दात कमेंट्स देत होते अशी माहिती सुसाईड नोटमधून समोर आली आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र नेहा यांच्यावर असणाऱ्या दबावामुळे त्यांनी पोलिसांत जाण्याचं धाडस केलं नाही का? त्यांच्या पतीला याबाबत कोणतीही पूर्व कल्पना नव्हती का असे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. नेहा यांच्या जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या सुसाईड नोटमुळे कंपनीमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढे काय भूमिका घेतात ह्याकडे कंपनीतील अधिकाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात कोण होणार मुख्यमंत्री? अमित शहा यांची UNCUT मुलाखत

Published by: Kranti Kanetkar
First published: October 18, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading