लग्नात वऱ्हाडी जेवणाच्या हॉलकडे वळली अन् दोघांनी सपासप वार करून आचाऱ्याला संपवलं

कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.

शहरातील डांगे लॉन्समध्ये एक लग्न सोहळा सुरू होता. मृत अखलेश मिश्रा आणि ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात आचारीचे काम करत होते.

  • Share this:
नागपूर, 26 डिसेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. किरकोळ कारणावरून लग्न समारंभ सुरू असताना लॉनमध्ये घुसून एका तरुणाची हत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी आहे. शहरातील हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉनमध्ये शुक्रवारी रात्री  10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अखलेश मिश्रा ( वय 31) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर 21 वर्षीय ओम मिश्रा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोल्हापुरात वसाहतीजवळ आला रानगव्याचा कळप, LIVE VIDEO शुक्रवारी संध्याकाळी डांगे लॉन्समध्ये एक लग्न सोहळा सुरू होता.  मृत अखलेश मिश्रा आणि ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात कॅटरर्समध्ये आचारीचे काम करत होते. स्वयंपाक सुरू असताना अचानक धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोरांनी लग्नात घुसून थेट स्वयंपाक खोली गाठली. त्यानंतर अखलेश याच्यावर चाकूने सपासप वार केले. अखलेशला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या ओम मिश्रावरही हल्लेखोरांनी वार केला. अखलेश जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर लग्न सोहळ्यातून पसार झाले. भर लग्नसमारंभात खुनाचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत अखलेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर ओम मिश्रा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. IND vs AUS : रवी शास्त्री रोहित-राहुलची कारकीर्द खराब करतायत? घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला अखलेशचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतक अखलेशची कॅटरिंगच्या पैशाच्या वादातून हत्या झाला होता, त्यातून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आ प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हुडकेश्वर पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: