मुंबई, 01 नोव्हेंबर : मित्रांमध्ये एकमेकांची चेष्टा मस्करी करणे हे काही, नवीन नाही. मात्र, चेष्टा मस्करी करण्यातून उद्भवलेल्या वादानंतर एका तरुणाची हत्या (Murder)करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) माहीम परिसरात घडली आहे.
दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, माहीमच्या वांजावाडी परिसरात शनिवारी ही घडली. शाहीद ऊर्फ बकत (25) असं मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत पाटलांनी हाताला काळ्या फिती लावून केला कर्नाटक सरकारचा निषेध, म्हणाले...
वांजावाडी परिसरातील पटेल इमारतीजवळ शाहीद आणि त्याचे काही मित्र हे पहाटे गप्पा मारत होते. गप्पा सुरू असताना नदीम शेख नावाच्या मित्राने शादीदची चेष्टा करण्यास सुरुवात केली. काही वेळाने चेष्टा मस्करीचे रुपांतर वादात झाले. नदीम आणि शाहीद यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेले. हा वाद नंतर इतका विकोपाला गेला की, भररस्त्यावर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.
तिथे उपस्थितीत असलेल्या काही मित्रांनी दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, दोघेही जण कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघांमध्ये भररस्त्यावर फ्री स्टाइल मारामारी सुरू झाली. त्याच दरम्यान, नदीमने शाहीदच्या डोक्यात दगड घातला. रक्तबंबाळ झालेल्या शाहीदला पाहून मित्रही घाबरले. पण, पुढे काही कळायच्या आता नदीमने चाकू आणून शाहीदच्या पोटात खुपसला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आजपासून OTP शिवाय येणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या काय आहे तुमचा बुकिंग नंबर
स्थानिकांनी या घटनेची माहिती माहीम पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी शाहीदचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी नदीमच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.