एकूलत्या एका लेकराचीही अज्ञातांनी केली निर्घृण हत्या, भिवंडीमध्ये धक्कादायक प्रकार

एकूलत्या एका लेकराचीही अज्ञातांनी केली निर्घृण हत्या, भिवंडीमध्ये धक्कादायक प्रकार

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

भिवंडी, 12 सप्टेंबर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असलं तरी गुन्ह्यांचे भयंकर प्रकार समोर आले आहेत. आताही भिवंडीत असाच हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही मित्रांनीच हे कृत केलं असल्याची प्राथमिक अंदाज समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी  तालुक्यातील  करंजोटी इथं आकाश नारायण शेलार या 21 वर्षीय तरुणाची गळा आवळून आणि नंतर वार करून  निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शेलार दांप्तत्याला आकाश हे एकच  मुलगा  होता. त्याची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात अज्ञात मित्रांविरोधात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा जिंदाल कंपनीत कामाला होता. आरोपींनी आकाशला फोन करून शेतात बोलावून घेतलं आणि त्यानंतर निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं यावर पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.

रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यामध्ये NCB ची रेड

पोलिसांनी घटनास्थळावरून आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 12, 2020, 8:52 AM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या