मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

19 वर्षीय घरकाम करणाऱ्या तरुणीला जिवंत जाळलं; बाथरूममध्ये मृतदेह पाहून आई हादरली!

19 वर्षीय घरकाम करणाऱ्या तरुणीला जिवंत जाळलं; बाथरूममध्ये मृतदेह पाहून आई हादरली!

 आपल्या देशात घरकामगार महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

आपल्या देशात घरकामगार महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

आपल्या देशात घरकामगार महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्‍ली, 1 ऑक्टोबर : दक्षिण दिल्‍ली स्‍थ‍ित लाजपत नगर सेंट्रल मार्केट (Lajpat Nagar Central Market) भागातील घरकाम करणाऱ्या (Domestic worker) 19 वर्षीय तरुणीला जाळून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घर मालकावर तरुणीला मारण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

या प्रकरणात घर मालकाविरोघात दिल्ली महिला आयोगाने (DCW) तक्रार केली असून दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस जारी केली आहे. आयोगाने राजधानीत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांना या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. दिल्‍ली महिला आयोगाकडून (Delhi Commission For Women) सांगण्यात आलं की, पीडित तरुणी मद्रासी कॅम्प, जल विहार, लाजपत नगरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून राहत होती. मुलीच्या आईने आयोगाला सांगितलं की, आज सकाळी त्यांची मुलगी कामासाठी घराबाहेर पडली. काही वेळानंतर तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मुलीने सांगितलं की, तिला मुलीचा फोन आला होता व ती फोनवर रडत होती. (a 19 year old housemaid burned alive Mother was shocked to see the body in the bathroom)

तामिळनाडूमधील मुलीचा फोन आल्यानंतर महिला तातडीने घराबाहेर पडली व जेथे त्यांची मुलगी काम करीत होती, तेथे जाण्यास निघाली. तिथं गेल्यावर पाहिलं तर त्यांची मुलगी पूर्णपणे जळालेल्या अवस्थे बाथरूममध्ये खाली पडली होती. यात तिचा मृत्यू झाला होता. आणि घरात कोणीच नव्हतं. मुलीची अवस्था पाहून महिला जोरजोरात ओरडू लागली. आणि आजूबाजूच्या लोकांना जमा केलं. महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं याचा तपास करायला हवा.

हे ही वाचा-पुणे: पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड

या प्रकरणाची दखल घेत आयोगाने पोलिसांना नोटीस जारी केली आहे आणि एफआयआर दाखल करण्याव्यतिरिक्त दोषींना लवकरात लवकर अटक करण्यास सांगितलं आहे. याशिवाय पोस्टमार्टमचा रिपोर्ट देण्यास सांगण्यात आलं आहे. आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी सांगितलं की, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आपल्या देशात घरकामगार महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या प्रकरणात तपास करण्याची गरज आहे आणि मुलीला न्याय मिळायला हवा.

First published:

Tags: Crime, Murder