बीड, 21 मे : बीडच्या (Beed News) अंबेजोगाई तेथे पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. शेख अब्रार शेख चाँद अस मृत तरुणाच नाव आहे. त्याच्या शोधकार्यासाठी 24 तास प्रयत्न सुरू होते. अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाझर तलावावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी तलावात उतरुन शेख अब्रार याला शोधण्याचा प्रयत्न केले. मात्र नागरिकांना यात यश आलं नाही. यातच जोराचा वादळी वारा व पाऊस यामुळे अडथळा निर्माण झाला आणि शोधकार्य थांबवावे लागले.
परळी नगर परिषदेच्या रेस्क्यु टीमने आज यंत्राद्वारे तलावातील अनेक ठिकाणी हवेचे प्रेशर सोडून तलावातील पाणी ढवळण्यास सुरुवात केली असता तरुणाचा मृतदेह वर आला. अब्रारचे पार्थिव त्यांच्या घरातील मंडळीं व नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. तरुण मुलाला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.