Home /News /crime /

14 वर्षांच्या स्वरुपला होते पबजी गेमचे वेड, राहत्या घरात घेतला गळफास

14 वर्षांच्या स्वरुपला होते पबजी गेमचे वेड, राहत्या घरात घेतला गळफास

नाशिक शहरातील भोई गल्लीत बुधवारी 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. स्वरूप असं या मुलाचं नाव आहे.

नाशिक, 11 डिसेंबर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगावात फ्री फायर गेमसाठी (free fire game)एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना एका 14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे (Pub G) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक शहरातील भोई गल्लीत बुधवारी 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. स्वरूप असं या मुलाचं नाव आहे. स्वरुपला पबजी गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. नेहमीप्रमाणे स्वरुप रात्री आपल्या घरातील वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. पण सकाळी बराच उशीर झाल्यामुळे तो खाली आला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने रूममध्ये जाऊन पाहणी केली असता मुलाने गळफास घेतल्याचे आढळून आले. होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली असता धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी स्वरूपला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अकास्मित मृत्यूची नोंद केली आहे. स्वरुपला पबजी गेम खेण्याचे व्यसन होते. पण, अलीकडे पबजी गेमला भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तरूण हे नैराश्यग्रस्त झाल्याची प्रकरणं समोर आली आहे. त्यातूनच आज स्वरुपने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. फ्री फायर गेमसाठी नांदगावात तरुणाची हत्या दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगावमध्ये ऑनलाइन फ्री फायरगेम (free fire game) खेळण्यासाठी मोबाईल हरवला म्हणून गावात एका निरपराध तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली होती. B'day Special: दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ऐकून व्हाल हैराण भौरी येथील जिभाऊ गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या खून झाला होता. त्याचा तपास करतांना पोलिसांनी याच गावातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता आपणच मोबाईलसाठी जिभाऊच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली दिला. सुनील मोरे असं या आरोपीचे नाव असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या