Home /News /crime /

नववीत शिकणाऱ्या मुलीवर 13 दिवसांत 8 जणांकडून बलात्कार, 6 आरोपी अल्पवयीन!

नववीत शिकणाऱ्या मुलीवर 13 दिवसांत 8 जणांकडून बलात्कार, 6 आरोपी अल्पवयीन!

मुलगी बेपत्ता झाल्याने, तिचे कुटुंबिय अतिशय चिंचेत होते. जवळपासच्या सर्वांकडे, इतर नातेवाईकांकडे मुलीची शोधाशोध करण्यात आली, परंतु ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि 5 डिसेंबर रोजी पोलिसांना मुलीचा शोध लागला.

पुढे वाचा ...
  बलरामपूर, 8 डिसेंबर : इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीवर गँगरेप (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींपैकी 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh)बलरामपूर (Balrampur) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी आपल्या घरी न सांगताच काही मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तेथेच तिची एका मुलाशी ओळख झाली. ती त्या मुलासोबत गेली असता, त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही, तर त्या मुलाने त्या विद्यार्थीनीला आणखी 8 मुलांकडे सोपावलं. त्या 8 जणांनी वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थीनीवर बलात्कार केला. विद्यार्थीनी 20 नोव्हेंबर रोजी घरी न सांगताच मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी भेटलेल्या एका तरूणासोबत ती गेली. 8 जणांनी, तब्बल 13 दिवस रोज एक-एक करून मुलीवर बलात्कार केला. सतत झालेल्या या प्रकारानंतर मुलीची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे.

  (वाचा - भिवंडी हादरली, 38 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार)

  मुलगी बेपत्ता झाल्याने, तिचे कुटुंबिय अतिशय चिंचेत होते. जवळपासच्या सर्वांकडे, इतर नातेवाईकांकडे मुलीची शोधाशोध करण्यात आली, परंतु ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि 5 डिसेंबर रोजी पोलिसांना मुलीचा शोध लागला.

  (वाचा - धक्कादायक प्रकरण! डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच केलं किडनॅप)

  त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थीनीच्या जबाबानुसार, आरोपींना अटक केली आहे.13 दिवसांत 8 लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं. 8 जणांपैकी 6 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Rape, Rape on minor

  पुढील बातम्या