नाशिक, 02 नोव्हेंबर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सामनगाव रोडवर गाडेकर मळ्यात एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यात होऊ नये या भीतीने शेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी लालबाबू यादव (वय 9) असं मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता. यादव कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही आढळून आला नाही. शाळेत, नातेकवाईकांकडे चौकशी करण्यात आली पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा मृत्यू
मंगळवारी दुपारी शेजारी राहणार्या तरुणाने आपल्या मुलगा रामजीला बरोबर नेल्याचे पालकांनी पाहिले होते. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजीबद्दल तरुणाकडे चौकशी केली. त्यावेळी या तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे विचारणी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
BHR घोटाळ्याची चौकशी भाजप सरकारच्या आदेशानुसारच, खडसेंनी दरेकरांना सुनावलं
या तरुणाने काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला सिन्नर इथं सोडतो म्हणून गाडीत बसवले होते. त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर त्याने प्रवाशाकडून मोबाइल फोन आणि 4 हजार रुपये लुटले होते. हा सर्व प्रकार मृत रामजी यादव या चिमुरड्याने पाहिला होता. आपण केलेली लूट कुणाला सांगू नको, अशी धमकी या तरुणाने मृत चिमुरड्याला दिली होती. पण, चिमुरडा कुठे तरी वाच्यात करेल या भीतीने चिमुरड्याला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून डुबेरे गावातील बंधार्यावर घेऊन गेला आणि गळा दाबून त्याचा खून केला.
आरोपी तरुणाने घटनास्थळाची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.