मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

3 वर्षाच्या मुलानं गोळी झाडल्यानं आठ महिन्याच्या भावाचा मृत्यू, असं नेमकं काय घडलं?

3 वर्षाच्या मुलानं गोळी झाडल्यानं आठ महिन्याच्या भावाचा मृत्यू, असं नेमकं काय घडलं?

एका आठ महिन्याच्या मुलाचा गोळी लागल्यानं मृत्यू (Baby Died in Firing) झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये बंदुक ठेवण्यात आली होती, ती तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या हातात आली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 एप्रिल : काही खेळ लहान मुलांच्या जीवावर बेतल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, अमेरिकेच्या (America) ह्यूस्टनमधून. ह्यूस्टन येथे एका आठ महिन्याच्या मुलाचा गोळी लागल्यानं मृत्यू (Baby Died) झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये बंदुक ठेवण्यात आली होती, ती तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या हातात आली. त्यानं खेळता खेळता गोळी झाडली. ही गोळी मुलाच्या छोट्या भावाला लागली. घटनेत आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.

ह्यूस्टन पोलीस विभागाच्या वेंडी बॅमब्रिज यांच्या म्हणण्यानुसार, या बाळाला शुक्रवारी सकाळी पोटामध्ये ही गोळी लागली. कुटुंबातील सदस्य जखमी बाळाला घेऊन रुग्णालयात गेले, मात्र त्याचा मृत्यू झाला. तपासात समोर आलं, की ही एक मोठी दुर्घटना होती, जी आई वडीलांच्या हलगर्जीपणामुळे घडली.

बॅमब्रिज म्हणाले, की 'मी सर्व पालकांना त्यांची शस्त्रे घरात कोणाच्याही हाताला सहज येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवत जा. शस्त्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बर्‍याच गोष्टी करू शकता. कृपया या कुटुंबासाठी प्रार्थना करा. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान शोधकर्त्यांना सुरुवातीला घटनेत वापरली गेलेली बंदुक सापडली नाही. नंतर ती त्या गाडीतून ताब्यात घेण्यात आली ज्यातून कुटुंबातील सदस्य बाळाला रुग्णालयात घेऊन गेले होते. बॅमब्रिज यांनी सांगितलं, की शोधकर्ते आणि फिर्यादी याचा विचार करत आहेत, की याप्रकरणी आरोप लावायचा की नाही. मात्र, या प्रकरणात पालकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Baby died, Gun firing