श्रीगंगानगर,25 जानेवारी: राजस्थानातील श्रीगंगानगरमधील (Sriganganagar) सादुलशहर पोलिस हद्दीत येणाऱ्या पतली गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 70 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. दोन्ही नराधम दारुच्या नशेत तर्रर्र होते. नराधमांनी आधी पीडित महिलेल बेदम मारहाण केली होती. पीडित महिलेवर सादुलशहर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा..नसीरुद्दीन शाहांच्या मुलगीच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार,समोर आलं धक्कादायक कारण
घरी एकटीच होती वयोवृद्ध महिला
मिळालेली माहिती अशी की, घटना घडली तेव्हा पीडित महिला घरी एकटीच होती. तिचा मुलगा उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या कामाने बाहेर गेला होता. पीडिता एकटी असल्याचे पाहून दोन्ही नराधम घरात घुसले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. रात्री उशीर पीडितेला मुलगा घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पीडितेला तातडीने स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी सादुलशहर येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा..निर्भया बलात्कार प्रकरणात खळबळ, तिहार जेलमध्ये दोषीला विष दिल्याचा आरोप
नराधमांनी कबूल केला गुन्हा...
70 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची सादुलशहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. दलेर सिंह आणि मीमा सिंह अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news