लखनऊ, 18 ऑक्टोबर : आपल्या मुलीवर बलात्कार (70 year old woman get life term for killing youth attempting rape on her daughter) करणाऱ्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी एका 70 वर्षांच्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालात या महिलेनं (Cold blooded murder) जाणीवपूर्वक तरुणाची हत्या केल्याचं म्हटलं आहे. महिला थोडासा विरोध करून तरुणाला बलात्कारापासून परावृत्त करू शकली असती, मात्र तिने जाणीवपूर्वक कुऱ्हाडीचे वार करून तरुणाचा खून केल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.
अशी घडली घटना
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर भागात ऑगस्ट 2010 साली कस्तुरी देवी यांच्या घरात प्रवीण नावाचा एक तरुण आला आणि त्याने कस्तुरी देवींच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला होता. प्रवीणचं कस्तुरी देवींच्या मुलीसोबत काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यातूनच त्याने आपल्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कस्तुरी देवी यांनी केला. तरुणाला सांगून तो ऐकत नसल्यामुळे अखेर आपण कुऱ्हाडीने वार केल्याचा दावा त्यांनी केला होता.
हे वाचा- NDvsPAK रद्द होणार मॅच? पाकच्या कुरापती पाहता Match रद्द करण्याच्या मागणीला जोर
कोर्टात समोर आली वेगळीच कहाणी
कस्तुरी देवींना प्रवीणचे त्यांच्या मुलीसोबत कुठलेही संबंध नको होते. या प्रेमप्रकरणाला त्यांचा विरोध होता. एक दिवस रात्रीचं जेवण झाल्यानंतर प्रवीण घरात आल्यानंतर त्याचा काटा काढण्याचा निर्णय़ कस्तुरी देवी यांनी घेतल्याचा दावा प्रवीणच्या वकिलांनी कोर्टात केला. प्रवीण घरात आल्याची संधी साधत तो बेसावध असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले आणि त्याचा मृतदेह घराबाहेर फेकून देण्यात आला. जर अनावधानानं हत्या झाली असती, तर लगेच मृतदेह बाहेर फेकून दिला नसता, असा युक्तीवाद प्रवीणचा खटला लढणाऱ्या वकिलांनी केला. हा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने कस्तुरी देवींवर ठपका ठेवला. अत्यंत थंड डोक्याने आणि विचारपूर्वक हा खून केल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Uttar pardesh