Home /News /crime /

60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; प्रेमात दुरावा आल्याने उचललं धक्कादायक पाऊल

60 वर्षीय प्रियकराचा 48 वर्षीय प्रेयसीवर हल्ला; प्रेमात दुरावा आल्याने उचललं धक्कादायक पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Bihar crime: एक 60 वर्षीय व्यक्ती आणि एक 48 वर्षीय महिला दोघांचे सुत जुळले होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, या दोघांमधील प्रेमसंबंध तुटले (Breakup) आणि यानंतर एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

  पाटणा, 23 मे : प्रेमाला (Love) वय नसतं, प्रेमाला वेळ नसते. प्रेम हे कुणावरही, कधीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. मात्र, हेच प्रेमसंबंध विकोपाला गेल्यानं अनेक विचित्र घटना घडल्याचे तुम्ही ऐकलं असेल. असेच प्रेमसंबंध (Relationship) तुटल्याने एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहार (Bihar) राज्यातील पाटणाच्या बेतियामध्ये घडली आहे. नेमकं काय घडलं? एक 60 वर्षीय व्यक्ती आणि एक 48 वर्षीय महिला दोघांचे सुत जुळले होते. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र, या दोघांमधील प्रेमसंबंध तुटले (Breakup) आणि यानंतर एक विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंध तुटल्याच्या रागात या 60 वर्षीय प्रियकराने आपल्या 48 वर्षीय प्रेयसीवर चक्क अॅसिड फेकले. (Acid Attack on Girlfriend) ही घटना पाटणाच्या बेतियामध्ये घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या अॅसिड हल्ल्यात ही 48 वर्षीय प्रेयसी गंभीर स्वरुपात भाजली आहे. या अॅसिड हल्ल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हेही वाचा - Bhokardan Crime : पत्नी घरी नसल्याने त्याने साधला डाव, विवाहित महिलेवर पहाटे अत्याचार
  12 वर्षांपूर्वी पत्नीच्या मृत्यूनंतर जुळवले सूत -
  या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, मुलांवरुन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. या पुरुषावर आपले प्रेम नाही, असे यातील पीडित महिलेने सांगितले आहे. तर 12 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, असे या प्रियकराने सांगितले आहे. पीडितेने प्रेमसंबंधाला नकार दिला आहे. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाची गावात चर्चा सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bihar, Boyfriend, Crime news, Girlfriend

  पुढील बातम्या